आपल्याकडे अमर्याद कल्पनाशक्ती असते. अनेकांना या शक्तीची कल्पना नसते आणि ध्येयप्राप्तीसाठी त्याचा वापर करण्यात ते अपयशी ठरतात. त्यामुळे त्यांना मिळणारे परिणाम हे फक्त सरासरीइतकेच असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त आणि अतिजागरूक मनाच्या शक्तीचा शोध घ्यायला लागता आणि ती मुक्त करता तेव्हा तुम्ही एक-दोन वर्षांतच अनेकांना मिळत नाही, त्याहून अधिक प्राप्त करू शकाल. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, इतक्या वेगाने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करू लागाल.
कल्पनाचित्र रेखाटण्याची तुमची क्षमता ही बहुधा तुमची सर्वात प्रबळ शक्ती आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व सुधारणांची सुरुवात ही मानसिक चित्रांतील सुधारणेपासून होते. कल्पनाचित्र रेखाटणे आकर्षणाच्या नियमाला कार्यान्वित करते. ते तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी आवश्यक अशा व्यक्ती, परिस्थिती आणि स्रोत यांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करते.
कल्पनाचित्र रेखाटणे ‘जसे आत, तसे बाहेर’ या सुसंवादाच्या नियमालाही कार्यान्वित करते. तुम्ही आतून जशी मानसिक चित्रे बदलता, तसे तुमचे बाह्य़ जगही आरशाप्रमाणे बदलू लागतं. तुम्ही जे चित्र डोळ्यांसमोर रेखाटता तसेच तुम्ही बनता. वायने डायर म्हणतात, ‘तुम्ही जेव्हा त्यावर विश्वास ठेवाल, तेव्हा तुम्ही ते पाहाल.’ डेनिस वेटली यांनी सांगितले आहे, ‘तुमची मानसिक चित्रे ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आकर्षणांची झलक असतात.’
अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी म्हटले होते, ‘कल्पना ही वास्तवापेक्षा अधिक महत्त्वाची आहे.’ नेपोलियन बोनापार्ट यांनी म्हटले होते, ‘कल्पना या जगावर राज्य करते.’ नेपोलियन हिल यांनी म्हटले होते, ‘व्यक्तीचे मन जे काही करू शकते आणि ज्यावर विश् वास ठेवू शकते, ते मिळवूही शकते.’
गोल्स – ब्रायन ट्रेसी, साकेत प्रकाशन, पृष्ठे – २५६, मूल्य – २२५ रु.