27 October 2020

News Flash

विद्यापीठ विश्व : व्यापक दृष्टीकोन देणारे शिक्षणकेंद्र

न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये पंधरा पदव्युत्तर आणि व्यावसायिक विभाग आहेत.

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

न्यूयॉर्क विद्यापीठ

* विद्यापीठाची ओळख – अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील लोअर मॅनहॅटन या परिसरामध्ये असलेले न्यूयॉर्क विद्यापीठ हे अमेरिकेतील एक जागतिक दर्जाचे, खासगी   संशोधन विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत त्रेचाळीसावा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना १८३१ साली झाली. या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे, ळ persevere and to excel. न्यूयॉर्कमध्ये लोअर मॅनहॅटन या भागातील ‘ग्रीनविच व्हिलेज’ या परिसरामध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाचा ऐतिहासिक मुख्य कॅम्पस सुमारे दोनशे तीस एकरमध्ये पसरलेला आहे. याशिवाय न्यूयॉर्क विद्यापीठाच्या अ‍ॅक्रा, बर्लिन, ब्यूनॉस आयर्स, फ्लॉरेन्स, लंडन, लॉस एंजिलीस, माद्रिद, पॅरिस, प्राग, सिडने, तेल अवीव, वॉशिंग्टन डी.सी. या ठिकाणी शैक्षणिक केंद्रे आहेत. तर अबूधाबी आणि शांघाय हे दोन पदवीदान करणारे आंतरराष्ट्रीय कॅम्पस आहेत. या विद्यापीठामध्ये जवळपास दहा हजार प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून पन्नास हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

* अभ्यासक्रम – न्यूयॉर्क विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत. पदवी स्तरावर २३०पेक्षाही अधिक शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत. हे सर्व विभाग जवळपास तीन हजार पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात. न्यूयॉर्क विद्यापीठामधील सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांशिवाय विद्यार्थ्यांना डॉक्टरल अभ्यासक्रम व प्रोफेशनल ग्रॅज्युएट डिग्रीज यांसारखे पर्यायही विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहेत. विद्यापीठाच्या अंडरग्रॅज्युएट स्कूल्स म्हणजे पदवी विभागांमध्ये दहा प्रमुख विभागांचा समावेश आहे. यामध्ये कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स, टंडन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग, स्टीनहार्ट स्कूल ऑफ कल्चर, एज्युकेशन अ‍ॅण्ड ुमन डेव्हलपमेंट, स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस, स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज, रोरी मेयर्स कॉलेज ऑफ नर्सिंग, सिल्व्हर स्कूल ऑफ सोशल वर्क, टीश स्कूल ऑफ आर्ट्स, गॅलॅटीन स्कूल ऑफ इंडिव्हिज्युअलाइझ्ड स्टडी, ग्लोबल लिबरल स्टडीज’ हे अंडरग्रॅज्युएट स्कूल्स आहेत. न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये पंधरा पदव्युत्तर आणि व्यावसायिक विभाग आहेत. वर उल्लेख केलेले दहा अंडरग्रॅज्युएट स्कूल्स हे पदवी स्तरावर स्वतंत्रपणे ग्रॅज्युएट स्कूल्स म्हणून कार्यरत आहेत. या दहा पदवी विभागांबरोबरच ग्रॅज्युएट स्कूल्समध्ये स्कूल ऑफ लॉ, स्कूल ऑफ मेडिसिन, कॉलेज ऑफ डेंटिस्ट्री, रॉबर्ट वॅग्नर ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक सर्व्हिस, सेंटर फॉर अर्बन सायन्स अ‍ॅण्ड प्रोग्रेस, कॉलेज ऑफ ग्लोबल पब्लिक हेल्थ या प्रमुख पदव्युत्तर विभागांचा समावेश आहे. दोन्ही स्तरांवरील विद्यापीठातील प्रवेश अतिशय स्पर्धात्मक आहेत.

विद्यापीठामधील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवर सक्षमतेने कार्यरत असलेल्या शैक्षणिक व संशोधन विभागांमध्ये एअरोस्पेस, अप्लाइड फिजिक्स, अ‍ॅस्ट्रोनॉमी, बायोइंजिनीअरिंग, केमिकल अ‍ॅण्ड बायोमॉलिक्युलर इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ह्य़ुमॅनिटीज, सायन्सेस, अँथ्रॅपॉलॉजी, इकोनॉमिक्स, हिस्टरी, िलग्विस्टिक्स, फिलोसॉफी, पॉलिटिकल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स, म्युझिक, डान्स, इंग्लिश, सायकॉलॉजी, एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, एज्युकेशन, पब्लिक अफेअर्स, लॉ, पब्लिक पॉलिसी, सोशल वेल्फेअर, जिओग्राफी यांसारख्या अनेक इतरही विषयांचा समावेश आहे.

* सुविधा – न्यूयॉर्क विद्यापीठाने शैक्षणिक व शिक्षणेतर अशा सर्व प्रकारच्या दर्जात्मक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने ‘हॉल्स ऑफ रेसिडन्सेस’ म्हणजे अत्याधुनिक सोयींनी सज्ज अशा वसतिगृहांची सोय केलेली आहे. बहुतांश आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कॅम्पसमधील वसतिगृहांमध्ये राहतात. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अधिकाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आर्थिक मदत केली जाते. विद्यापीठामध्ये १३० देशांमधून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, कॅम्पस जॉब्ज व

तत्सम स्वरूपाची इतर मदत पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भारतीय खाद्यपदार्थासहित जगभरातील विविध खाद्यप्रकार आहेत. कॅम्पसमध्ये सर्व अद्ययावत सोयी उपलब्ध असून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले जवळपास साडेचारशे स्टुडंट क्लब्स आणि तत्सम विद्यार्थी संघटना वा संस्था आहेत.

* वैशिष्टय़ – न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन व्यापक दृष्टिकोन लाभलेले संस्थेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत. विद्यापीठाच्या पाच लाखांपेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांचे जाळे जगातील जवळपास १८० देशांमध्ये पसरलेले आहे. यामध्ये फक्त अमेरिका-युरोपमधीलच नव्हे तर अनेक देशांमधील राजकीय आणि सामाजिक नेतृत्व करणारे नेते, शास्त्रज्ञ, अंतराळवीर, माध्यम प्रतिनिधी, उद्योगजगतातील विविध जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या कंपन्यांचे संस्थापक आणि फॉर्च्यून-५०० या यादीमध्ये असलेल्या कंपन्यांचे सीईओ इत्यादींचा समावेश आहे. विद्यापीठातील प्राध्यापक व माजी विद्यार्थ्यांमध्ये एकूण सदतीस नोबेलविजेते, पाच फील्ड पदकविजेते, आठ टय़ुरिंग पुरस्कार विजेते, तीस पुलित्झर पुरस्कार विजेते आणि नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस व युनायटेड स्टेट काँग्रेस या संस्थांमधील शेकडो संशोधक-प्राध्यापकांचा समावेश आहे. विद्यापीठातील सध्याचे काही प्राध्यापक हे त्यांच्या संशोधन क्षेत्रातील नोबेल विजेते आहेत.

* संकेतस्थळ –  http://www.nyu.edu/

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2019 3:10 am

Web Title: information article about new york university zws 70
Next Stories
1 सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा
2 आर्थिक विकास
3 कर सहायक पदनिहाय पेपरची तयारी
Just Now!
X