News Flash

इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नोलॉजी

पश्चिम हिमालयातील जैवसंपदेची जाणीवपूर्वक जोपासना करणाऱ्या हिमाचल प्रदेशमधील इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नोलॉजी या संस्थेच्या कार्याचा आढावा -

| September 2, 2013 08:20 am

पश्चिम हिमालयातील जैवसंपदेची जाणीवपूर्वक जोपासना करणाऱ्या हिमाचल प्रदेशमधील इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नोलॉजी या संस्थेच्या    कार्याचा आढावा –

हिंमाचल प्रदेश राज्य सरकारच्या पुढाकाराने हिमाचल प्रदेश व भोवतालच्या प्रदेशातील जैव संपदेवरील संशोधनासाठी भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन प्रयोगशाळेची एक संशोधन शाखा पालमपूर येथे १९८३ मध्ये उभारण्यात आली. हिमाचल प्रदेशातील पर्वतीय भागातील जैव संपदा, चहा लागवड, फुलांची लागवड, बांबू, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे व त्याच वेळी या वनस्पतींची हेतुपूर्वक जोपासना करणे या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली गेली. १९९७ पासून सदर प्रयोगशाळा इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नोलॉजी या नावाने ओळखली जाऊ लागली.
संस्थेतील प्रमुख अभ्यास विषय
संस्थेच्या स्वयंपूर्ण प्रयोगशाळेत प्रोटेओमिक्स (प्रथिनांचा अभ्यास), जेनोमिक्स (पेशीय गुणसूत्रांचा अभ्यास), मेटाबोलोमिक्स (जैव पेशींचा रासायनिक अभ्यास) यांचा अभ्यास केला जातो. हिमालयाच्या थंड वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचा यात अंतर्भाव होतो.
जैव विविधता
हिमालयातील पर्वतराजीमध्ये असलेल्या जैव संपदेबद्दल नवनवीन माहिती मिळवण्यासाठी संस्थेचे संशोधनकार्य बहुशाखीय स्वरूपात सुरू आहे. पर्वतीय भागातील नसíगक संपत्तीचा आढावा घेणे. पश्चिम हिमालयातील जैव विविधतेचे वर्गीकरण करणे, त्या संपदेचा प्राचीन इतिहासाची माहिती नोंदवून ठेवणे. औषधी वनस्पतींची ओळख आणि माहिती मिळवणे. ही कामे संस्थेच्या या शाखेकडून केली जातात.
जैव तंत्रज्ञान
संस्थेची ही शाखा प्लान्ट टिश्यू कल्चर, प्लान्ट मॉलीक्यूलर बायोलॉजी, प्लान्ट फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री या तीन महत्त्वाच्या संशोधनात कार्यरत आहे. आíथकदृष्टय़ा किफायतशीर असलेल्या वनस्पतींची (उदा. चहा, बांबू, गुलाब, औषधी वनस्पती वगरे.)मोठय़ा प्रमाणावर लागवड हे प्लांट टिश्यू कल्चर तंत्राच्या संशोधनाचे प्रयोजन आहे.) वनस्पतींचा संकर, बीजांचा जीवशास्त्रीय अभ्यास या विषयातील संशोधन या शाखेत केले जाते.
जैवसंपदेची विभागवार आखणी
संस्थेच्या या उपक्रमांतर्गत हिमाचल प्रदेशातील शेतीखाली असणाऱ्या अनेक भागांचा हवामानाच्या दृष्टीतून आढावा घेण्यात आला आहे. या मागील मुख्य उद्देश आíथकदृष्टय़ा फायदेशीर ठरणाऱ्या पिकांसाठी अनुकूल हवामान असलेली जमीन निश्चित करणे. पश्चिम हिमालयात उगवणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण वनस्पतींचे एक संग्रहालयदेखील या संशोधनांतर्गत विकसित झाले आहे.
जैवसंपदेची जपणूक आणि प्रभावी वापर
पोडोफिलम हेक्झानड्रम ही पोडोफिलोटोकझीन हे द्रव्य बनवण्यासाठी वापरण्यात येणारी वनस्पती, हिमाचलच्या जंगलातून वेगाने वापरली जात आहे, त्या तुलनेत वनस्पतीच्या वाढीचा वेग कमी आहे. यासाठी अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी संस्थेच्या संशोधक चमूने यावर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. वनस्पतीच्या वाढीच्या वेगावरही उपाय शोधण्यात यश आले आहे.
पिकोरीहृझा कुरोआ ही वनस्पती अनेक रासायनिक द्रव्ये बनवण्यासाठी जंगलातून वापरली जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थेने योग्य ती पावले उचलली आहेत. त्याची जोपासनाही करण्यात येत आहे.
गीन्को बिल्लोबा गीन्को या जिवंत जीवाश्म याच्या जपणुकीसाठी संस्थेचे प्रयत्न सुरू  आहेत. याच्या लागवडीसाठी योग्य जमिनीच्या निर्मितीचे संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या संस्थेच्या एक एकर जागेमध्ये या झाडाची लागवड करण्यात आली आहे. जंगलात लागवडीसाठी अनेक याच प्रकारची रोपे पाठविण्यात आली आहेत.
मसाल्याच्या वेलचीच्या मोठय़ा प्रमाणावरील लागवडीसाठी संस्थेकडून संशोधन करण्यात आले.
खाद्यपदार्थात वापरण्यात येणारे केशर ज्या वनस्पतीपासून बनवले जाते, त्या वनस्पतीची लागवड मोठय़ा प्रमाणावर हिमाचल क्षेत्रात शक्य व्हावी यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.  
विशिष्ट असा लाल रंग ज्या वनस्पतीच्या मुळांपासून बनवतात, त्या वनस्पतीची बेसुमार तोड जंगलातून केली जाते. यावर संस्थेने संशोधनातून उपाय शोधला आहे.
अस्थमा रोगावर इलाज म्हणून वापरण्यात येणाऱ्या वनस्पतीची माहिती व गुणधर्म तपासून त्या वनस्पतीची मोठय़ा प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे.
डास नष्ट करणारे तसेच शरीरातील सूज कमी करणारे द्रव्य असणारी वनस्पती कुर्कुमा अरोमॅटिका हिची नवीन जात हिम्हल्दी शोधण्यात संस्थेने यश मिळवले आहे.
याचबरोबर खालील माहितीचा साठाही संस्थेने जमा केला आहे.
पश्चिम हिमालयातील जैवसंपदेची माहिती, पारंपरिक माहितीचे डिजिटल ग्रंथालय, पारंपरिक औषधी वनस्पतींची माहिती, पारंपरिक खाद्य, अन्नस्रोत यांची माहिती.
अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी संस्थेच्या संशोधकांनी काही विशिष्ट वनस्पतींपासून रसायन उद्योगात तसेच औषध उद्योगात वापरली जाणारी द्रव्ये शोधण्यात यश मिळवले आहे.
शास्त्रीय पद्धतीने चहा लागवड
संस्थेतील शास्त्रज्ञांचा एक चमू चहाच्या शेतीचे उत्पन्न तसेच उत्पादित चहाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यरत आहे. यासाठी संस्थेच्या ३२ एकर जागेवर चहाची लागवड, त्यावरील शेतकीचे प्रयोग, चहाच्या पिकापासून कीटकनाशक निर्मिती, चहाच्या पिकावरील निरनिराळ्या रोगांचा अभ्यास व उपाययोजना यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.
चहाच्या शेतीतील संशोधन, उच्च दर्जाच्या चहाच्या पिकाचा लागवडीसाठी वापर, पूर्वी चहा लागवड झालेला भाग पुन्हा लागवडीखाली आणणे, तसेच नवीन भाग शेतीसाठी तयार करणे, चहाच्या पिकाची नसíगकरीत्या वाढ, चहाच्या शेतातील तण आणि रानगवताचे नियोजन, चहाच्या पिकावरील कीटकनाशके या सर्व बाबींवर संशोधन सुरू आहे.                                                      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 8:20 am

Web Title: institute of himalayan bioresource technology
Next Stories
1 रोजगार संधी
2 विज्ञान सुसंवादक फेलोशिप
3 इंडियन इकॉनॉमिक सव्‍‌र्हिस
Just Now!
X