आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडचे हे दहावे वर्ष आहे. विशेष म्हणजे दशकपूर्तीचे हे आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड आपल्या भारतात आणि तेही महाराष्ट्रात विद्य्ोच्या माहेरघरी म्हणजे पुण्यात भरत आहे. या परीक्षेच्या नेमक्या स्वरूपाविषयी..
स्पर्धापरीक्षा या आजच्या शिक्षणप्रणालीच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षासुद्धा स्पर्धापरीक्षांच्या स्वरूपात घेतल्या जातात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा काही स्पर्धापरीक्षा घेतल्या जातात. ‘ऑलिम्पियाड’ ही अशीच एक आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी स्पर्धापरीक्षा.
वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जातात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विषयांतील नपुण्य जोखण्यासाठी ‘ऑलिम्पियाड’ स्पर्धापरीक्षांचं आयोजन केलं जातं. अर्थात, या स्पर्धा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच असतात. उच्चमाध्यमिक स्तरापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि खगोलविज्ञान व खगोलभौतिकी अशा पाच विषयांवर स्वतंत्रपणे ऑलिम्पियाड स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. अशाच प्रकारची ‘ऑलिम्पियाड’ स्पर्धा शालेय स्तरावरसुद्धा ‘इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड’ या नावाने घेतली जाते.
‘ऑलिम्पियाड’ हे नाव वापरून अनेक खासगी संस्था शालेय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धापरीक्षा घेत असतात. अर्थातच या परीक्षांना ‘ऑलिम्पियाड परीक्षा’ म्हणून कोणतीही अधिकृत मान्यता नाही आणि या परीक्षांचा ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडशी दुरान्वयेही संबंध नाही. त्यामुळे केवळ ‘ऑलिम्पियाड’ या नावामुळे स्वत:ची दिशाभूल होऊ न देण्याची खबरदारी पालकांनी घेण्याची गरज आहे.
मुळात ‘ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड’ म्हणजे काय, परीक्षेला बसण्यासाठी पात्रता काय असते आणि या स्पर्धापरीक्षेला बसायचं असेल तर काय करावं लागतं इत्यादी गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.
आपल्या देशामध्ये ऑलिम्पियाड परीक्षांचा उपक्रम राबवण्यासाठी केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अणुऊर्जा विभाग आणि मानव संसाधन विकास मंत्रालय यांचं पाठबळ मिळतं.
आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पाठांतरावर भर दिला जातो, पण ऑलिम्पियाड परीक्षांमध्ये मात्र पाठांतरापेक्षा विषय समजण्यावर जास्त भर आहे. विज्ञानातले मूलभूत विषय विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यासावेत आणि आपल्या पुढच्या आयुष्यात या विषयांमध्ये भरीव कामगिरी करावी या उद्देशाने ऑलिम्पियाड परीक्षांचं आयोजन करण्यात येतं.
वेगवेगळ्या विषयांवरील ऑलिम्पियाड स्पर्धापरीक्षांना विज्ञान शाखेत शिकणारे अकरावी- बारावीचे विद्यार्थी बसू शकतात; तर माध्यमिक स्तरापर्यंत असलेल्या सी.बी.एस.सी., आय.सी.एस.सी, किंवा देशातल्या कोणत्याही राज्याच्या माध्यमिक बोर्डाशी संलग्न असलेले इयत्ता नववी-दहावीचे विद्यार्थी ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड स्पध्रेला बसण्यासाठी पात्र असतात. अर्थात, हे विद्यार्थी थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील जुनिअर सायन्स ऑलिम्पियाडला बसू शकत नाहीत, तर त्यांना वेगवेगळ्या पात्रता फेऱ्या पार कराव्या लागतात.
आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडसाठी पात्र होण्यासाठी असलेली पहिली परीक्षा म्हणजे नॅशनल स्टँडर्ड एक्झामिनेशन इन ज्युनिअर सायन्स म्हणजेच ठरएखर ही दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी घेतली जाते. या परीक्षेत ८० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी दोन तासांचा अवधी दिला जातो. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सी.बी.एस.सी.चा इयत्ता दहावीपर्यंतचा विज्ञानाचा आणि थोडय़ा प्रमाणात गणिताचा अभ्यास करणं आवश्यक असतं.
प्रत्येक राज्यातील मोठय़ा शहरातील काही निवडक शाळा या पहिल्या टप्प्यावर घेतल्या जाणाऱ्या ठरए परीक्षेची नोंदणीकृत केंद्रे असतात. परीक्षेचा फॉर्म याच केंद्रावर उपलब्ध करण्यात येतो. निर्धारित परीक्षा शुल्कासह पूर्ण भरलेला फॉर्म पुन्हा त्याच केंद्रावर द्यायचा असतो. सर्वसाधारणपणे १५ सप्टेंबर ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असते.
जुनिअर सायन्स ऑलिम्पियाडची ही पहिल्या टप्प्यावरची परीक्षा इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स या संस्थेमार्फत घेतली जाते. त्यामुळे या परीक्षेची तपशीलवार माहिती संस्थेच्या www.iapt.org.in या इंटरनेट संकेतस्थळावर मिळू शकते. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या http://olympiads.hbcse.tifr.res.in या संकेत स्थळावरसुद्धा ऑलिम्पियाड परीक्षांची सविस्तर माहिती मिळू शकते.
ज्युनिअर सायन्स ऑिलपियाडच्या NSE या पहिल्या टप्प्यातील परीक्षेला देशभरातून ४० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी बसतात. त्यापकी गुणानुक्रमे सुमारे तीनशे विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या पातळीवरच्या परीक्षेसाठी केली जाते. देशभरातून १५ केंद्रांवर साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात या परीक्षेचं आयोजन करण्यात येतं.
ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडच्या या दुसऱ्या टप्प्यापासून ते थेट भारतीय संघ आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होईपर्यंतची सगळी जबाबदारी मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे घेतली जाते.
दुसऱ्या पातळीवर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेतल्या गुणानुक्रमानुसार पस्तीस विद्यार्थ्यांची निवड विशेष प्रशिक्षण देण्यासाठी केली जाते. या विद्यार्थ्यांसाठी मे-जून महिन्यात १५ दिवसांचं प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येतं आणि या प्रशिक्षणादरम्यान आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडच्या धर्तीवर घेतल्या जाणाऱ्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणारा सहा विद्यार्थ्यांचा संघ निवडला जातो.
ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडसाठी घेण्यात येणाऱ्या या सगळ्या पात्रता परीक्षांचं माध्यम इंग्रजी असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे.
आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सुमारे ४० पेक्षा जास्त देश सहभागी होतात. २००४ सालापासून भारतानेही या परीक्षेत सहभागी व्हायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, दरवर्षी आपल्या संघात असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला सुवर्ण किंवा रजत पदक मिळालेलं आहे. २०१० साली झालेल्या ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये आपल्याला चार सुवर्ण आणि दोन रजत पदकं मिळाली होती.
आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडचं हे दहावं र्वष आहे. विशेष म्हणजे दशकपूर्तीचं हे आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड आपल्या भारतात आणि तेही महाराष्ट्रात विद्य्ोच्या माहेरघरी म्हणजे पुण्यात भरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी प्रत्येक देशाचा सहा विद्यार्थ्यांचा संघ असतो आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयातला प्रत्येकी एक असे एकूण तीन मार्गदर्शक असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ऑिलपियाड ज्या देशात आयोजित करण्यात येतं त्या देशाला मात्र आपले दोन संघ पाठवता येतात. त्यामुळे यंदा भारताचे १२ विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सहा मार्गदर्शक शिक्षक यात सहभागी होणार आहेत. यंदाच्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑिलपियाडमध्ये सहभागी होणाऱ्या संघाची निवड अर्थातच झालेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्युनिअर सायन्स ऑिलपियाडमध्ये निवड होऊ शकेल अशा संभाव्य विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांची निवड झाली आहे अशा विद्यार्थ्यांना होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे विशेष मार्गदर्शन केलं जातं. याबद्दल अर्थातच पुढील भागात!
(पूर्वार्ध)
‘ऑलिम्पियाड’ हे नाव वापरून अनेक खासगी संस्था शालेय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेत असतात. अर्थातच या परीक्षांना ‘ऑलिम्पियाड परीक्षा’ म्हणून कोणतीही अधिकृत मान्यता नाही आणि या परीक्षांचा ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडशी दुरान्वयेही संबंध नाही. त्यामुळे केवळ ‘ऑलिम्पियाड’ या नावामुळे स्वत:ची दिशाभूल होऊ न देण्याची खबरदारी पालकांनी घेण्याची गरज आहे.