फारुक नाईकवडे

मागील लेखामध्ये मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर दोनच्या प्रश्नांचे विश्लेषण व त्याआधारे चर्चा करण्यात आली. या चच्रेच्या अनुषंगाने या पेपरमधील भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था या उपघटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. विधि उपघटकाबाबत ( समर्पक कायदे) त्यानंतर चर्चा करण्यात येईल.

या पेपरची विभागणी पुढील चार उपविभागांमध्ये केल्यास अभ्यासासाठी सोयीचे ठरते.

१. भारताचे संविधान व प्रशासन मूलभूत व संकल्पनात्मक भाग

२. राजकारण संकल्पनात्मक भाग

३. राज्यव्यवस्था व प्रशासन विश्लेषणात्मक भाग

४. समर्पक कायदे

हे सगळे विभाग एकमेकांशी संबंधित असल्यमुळे त्यांचा स्वतंत्रपणे नव्हे तर टप्प्याटप्प्याने अभ्यास आवश्यक आहे मूलभूत संज्ञा संकल्पना समजून घेऊन पुढचा विश्लेषणात्मक अभ्यास, चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे फायद्याचे ठरते. पहिल्या तीन उपविभागांच्या अभ्यासाचे नेमके स्वरूप कसे असावे ते पाहू.

भारताचे संविधान

घटनेच्या सरनाम्यातील तत्त्वज्ञान, हेतू व्यवस्थित समजून घेऊन या आधारे पुढील अभ्यास करणे आवश्यक आहे. घटनेतील सगळ्या कलमांचा अभ्यास आवश्यक नाही. मूलभूत हक्क (Fundamental Rights) ची क्र. १४- ३२ ही कलमे सर्व बारकाव्यासहित समजून घ्यावी. याचप्रमाणे राज्याची नीतीनिर्देशक तत्त्वे (Directive Principles of State Policy)) मूलभूत कर्तव्ये (Fundamental Duties) या बाबतची कलमेही परिपूर्ण करायची आहेत. केंद्र राज्य संबंध (Centre State Relations) ही संकल्पना वेगवेगळ्या मुद्दय़ांच्या संदर्भात समजून घ्यावी लागते. यामध्ये प्रशासकीय, आíथक, न्यायिक व इतर बाबतीत केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे त्याबाबतची कलमे नीट समजून घ्यायला हवी. याबाबत घटनेच्या सातव्या अनुसूचीचा संदर्भ लक्षात घ्यायला हवा.

घटनात्मक पदे,  (Constitutional posts)  अभ्यासताना

2 संबंधित कलम  2 काय्रे

2 अधिकार  2 नेमणुकीची पद्धत

2 पदावरून काढण्याची पद्धत 2 सध्या त्या पदावरील व्यक्तिचे नाव हे मुद्दे पाहावेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग (upsc) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (mpsc) याबाबतची

2 कलमे  2 त्यांची रचना  2 काय्रे  2 सध्याचे सदस्य व अध्यक्ष  2 त्यांची वाटचाल.

याबाबत विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जाऊ शकतात.

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांच्या 2 स्थापनेमागची पाश्वभूमी 2 कायदे  2 रचना  2 बोधचिन्ह  2 बोधवाक्य  2 काय्रे  2 त्यांचे प्रमुख  2 त्यांच्या वाटचालीचे टप्पे, इ. माहिती असणे आवश्यक आहे. प्रशासकीय न्यायाधिकरणांचा अभ्यासही आवश्यक आहे.

घटनादुरुस्ती (Constitutional Amendmen) व न्यायिक पुनर्वलिोकन (Judicial review) हे दोन मुद्देही महत्त्वाचे आहेत. घटनादुरुस्ती प्रक्रिया या विभागात अभ्यासली की पुढच्या टप्प्यामध्ये त्या त्या मुद्दय़ांबाबतच्या घटनादुरुस्त्या लक्षात घ्यायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे घटनेचा अर्थ विषद करणारे महत्त्वाचे निर्णय माहीत असणे आवश्यक आहे.

प्रशासन

प्रशासनामध्ये तीन घटक पाहायचे आहेत. पहिला घटक राज्य प्रशासनामध्ये (State Administration) मंत्रालयीन कामकाजाची कल्पना असणे गरजेचे आहे. दुसरा घटक आहे ग्रामीण प्रशासन. यामध्ये जिल्हा ते ग्रामपंचायत उशा उतरंडीचा सारणी पद्धतीमध्ये (table from) अभ्यास करता येईल. यामध्ये पुन्हा महसुली व विकासात्मक व पोलीस प्रशासन वेगवेगळे लक्षात घ्यायला हवे. अधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक, राजीनामा, पदावरून काढून टाकणे या बाबी समजून घ्यायला हव्यात. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी याच प्रशासनाचा भाग आहेत. तिसरा घटक आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा. यांचे प्रकार, निवडणूक, रचना, काय्रे, अधिकार इ. बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात. स्थानिक नागरी व ग्रामीण प्रशासनातील पदाधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक या बाबीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्त्यांमधील तरतुदी, स्थानिक स्वराज्य संस्थाकडे सोपवलेले विषय, सुरू केलेल्या समित्या / आयोग इ.चा अभ्यास आवश्यक आहे. या समित्यांकडून करण्यात आलेल्या शिफारशी, त्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय व त्यांची अंमलबजावणी यांचा नेमका अभ्यास करायला हवा.