24 September 2020

News Flash

मुंबई विद्यापीठाचा मराठी पत्रकारिता अभ्यासक्रम

मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत एक वर्ष कालावधीचा मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

| June 16, 2014 01:04 am

मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत एक वर्ष कालावधीचा मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कुठल्याही विद्याशाखेतून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. सतत बदलत्या माध्यमविश्वाशी गती राखणारा हा अभ्यासक्रम असून माध्यमक्षेत्राचा इतिहास शिकवताना त्यात झालेले बदल आणि होऊ घातलेल्या बदलांची सखोल माहिती या अभ्यासक्रमात दिली जाते. २०१४-२०१५च्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून रविवार, २० जुलै रोजी स. ११ ते १२ या वेळेत लेखी परीक्षा आणि नंतर तोंडी परीक्षा घेऊन २६ जुलैपासून या अभ्यासक्रमाला प्रारंभ होईल.
दररोज सायं. साडेसहा ते साडेआठ या वेळेत गरवारेत हे अभ्यासक्रम होतील.
दूरस्थ नोकरीधर विद्यार्थ्यांसाठी तसेच रायगड जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी दर शनिवार, रविवार ११ ते ६ या वेळेत
खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात या वर्गाची एक शाखा चालवली जाते. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी २६५३०२५९ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच सीकेटीच्या ९३२४३७२९७० या क्रमांकावर संपर्क साधावा.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 1:04 am

Web Title: mumbai universities marathi journalism syllabus
टॅग Journalism
Next Stories
1 मरिन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी, कोचीन येथे ज्युनिअर टेक्निकल ऑफिसरच्या ५ जागा
2 स्टेनोग्राफर निवड परीक्षा
3 टेक्स्टाइल प्रोसेसिंगमधील पदविका
Just Now!
X