पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या सामान्य विज्ञान विषयाच्या तयारीच्या दृष्टीने पुढील माहिती देत आहोत.

पचनसंस्था (Digestive System)
अन्ननलिका – अन्ननलिकेत खालील भागांचा समावेश होतो.
मुखगुहा (Mouth/buccal cavity), ग्रसनी (Pharynx), ग्रासिका (Oesophagus), जठर /अमाशय (Stomach), लघुआंत्र/लहान आतडे (Small intenstine) – याचे ३ भाग असतात- आदयांत्र (Duodenum), मध्यांत्र (Jejunum), शेषांत्र (Ileum), बृहद्आंत्र /मोठे आतडे (Large intestine), मलाशय (Rectum), गुद्वार (Anus)
मुखगुहा (Mouth) – लाळ (Saliva)- लाळेच्या तीन ग्रंथी (Salivery glands) असतात- कर्णमूल ग्रंथी, अधोहनु, अधोजिव्हा ग्रंथी
लाळ किंचित आम्लरीधर्मी (Slightly alkaline) असते. त्यामुळे अन्नातील जीवाणूचा नाश होतो. कार्य – अन्नातील पचनास सुलभ अशी पेस्ट तयार करण्यासाठी लाळेमध्ये टायलिन (ptylin) नावाचे विकर असते. हे विकर स्टार्चचे रूपांतर माल्टोजमध्ये करते. भाकरी चावल्यावर गोड लागते कारण स्टार्चचे रूपांतर माल्टोजमध्ये होते. भीतिदायक घटना घडल्यास लाळग्रंथीतून लाळ पाझरणे बंद होते.
ग्रसनी/घसा (Pharynx)- श्वासनलिका व अन्ननलिकांची तोंडे ग्रसनीमध्ये असतात. श्वासनलिकेच्या तेंडावर अधिकंठ नावाची झडप असते. अन्नकण श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून त्याचा उपयोग होत असतो.
ग्रासिका – लांबी सुमारे २५ सेंमी असते. यातून स्नायूंच्या आंकुचनामुळे अन्न खाली उतरत असते.
जठर – जठरात अन्न चार तास राहते, जठर रस  (gastric  juice) तसेच पेप्सीन व रेनिन ही दोन जाठरसार विकरे असतात. त्याचप्रमाणे जठरात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड (HCI) असते. रेनिन हे विकर फक्त लहान मुलांमध्ये आढळते, हे विकर दुधातील केसीनचे रूपांतर पॅराकेसीनमध्ये करते. हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड पचनासाठी माध्यम पुरवते. त्यामुळे जठरातील माध्यम आम्लधर्मी बनते. जठरात पचलेल्या अन्नाचे शोषले जात नाही तर फक्त पाणी, अल्कोहोल व औषधे शोषले जाते.
लहान आतडे – लहान आतडय़ाची लांबी सहा ते सव्वासहा मीटर असते आणि तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे. अन्नाचे मुख्यत्वे पचन येथे होते. जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण येथे होते. उरलेले अन्न सहा ते आठ तास येथे राहते. त्याचे पचन यात होते. लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागाला आदयांत्र (duodenum) असे  म्हणतात. आदयांत्रात पुढील दोन प्रकारचे स्राव मिसळले जातात-
*    स्वादुिपड रस– हा रस स्वादुिपडातून स्रवतो व आदयांत्रात येऊन मिसळतो. यामध्ये  Trypsin, Amylase ,Lypase ही तीन विकरे असतात.
*    पित्तरस – पित्तरस यकृतातून स्रवतो व तो आदयांत्रात येऊन मिसळतो. पित्तरस स्निग्धपदार्थाचे ीे४’२्रऋ्रूं३्रल्ल म्हणजेच स्निग्ध पदार्थाच्या मोठय़ा कणांचे विभाजन छोटय़ा छोटय़ा कणांमध्ये घडवून आणतो.
मोठे आतडे– मोठय़ा आतडय़ाची लांबी दीड मीटर असते. यात पचलेले अन्न शोषले जात नाही. फक्त पाणी शोषले जाते. मोठय़ा आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स  ही छोटी टय़ुब जोडलेली असते.
ग्रंथी
बाह्य़स्रावी ग्रंथी (Exocrine glands) : याचा स्राव आवश्यक जागी प्रत्यक्षपणे किंवा नलिकांद्वारे वाहून नेला जातो. म्हणून त्यांना नलिकांसहित ग्रंथी म्हणतात. यांचा स्राव एकतर शरीरात स्रवतो किंवा शरीराबाहेर विसर्जति केला जातो. यांपकी काही ग्रंथींच्या स्रावांना विकर enzymes) म्हणतात. उदा. यकृत, किडनी, घामाच्या ग्रंथी, लाळेच्या ग्रंथी, जठर आतडय़ाच्या ग्रंथी इ.
अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands) : यांचा स्राव रक्तात मिसळला जातो व त्याद्वारे आवश्यक जागी पोहोचतो. त्यांना नलिका नसतात. म्हणून त्यांना नलिकाविरहित (ductless) म्हणतात. यांचाही स्राव एकतर शरीरात किंवा शरीराच्या बाहेर स्रवतो. यांच्या स्रावांना संप्रेरके म्हणतात. उदा. पीयूषिका ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी, पॅराथायरॉइड ग्रंथी, स्वादुिपड, थायमस, अधोवृक्क ग्रंथी, प्लीहा, अंडाशय, वृषण इ.
स्वादुिपड – स्वादुिपड ही एकमेव ग्रंथी आहे, जी बहिस्र्रावी तसेच अंतस्र्रावी आहे. स्वादुिपडाच्या बहिस्र्रावी भागातील पेशींमधून स्वादुिपड रस नावाचा पाचक रस स्रवत असतो. हा रस अंतत: लहान आतडय़ाच्या आदयात्रांमध्ये (duodenum) आणून सोडला  जातो. स्वादुपिंडाच्या अंतस्र्रावी भागात लँगरहॅन्सची द्वीपे (islets of Langerahns) या नावाच्या पेशी विखुरलेल्या असतात. त्यांच्यापकी अल्फा पेशीमधून ग्लुकॅगॉन नावाचे हार्मोन, बीटा पेशींमधून इन्सुलिन नावाचे हार्मोन, तर डेल्टा पेशींमधून सोमॅटोटापीन हे वाढीचे हार्मोन स्रवत असते. इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित केले जाते. स्वादुिपडामध्ये बिघाड झाल्यास इन्सुलिनची निर्मिती कमी झाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह होतो.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..

किडनी / वृक्क
वृक्क दोन असतात, मात्र एक वृक्क असेल तरी पुरेसे ठरते. युरिया, अमोनिया, युरिक अ‍ॅसिड, सल्फ्युरिक अ‍ॅसिड यासारखे टाकाऊ पदार्थ रक्तातून बाजूला करून विसर्जति करण्याचे कार्य किडनी करीत असते. यातील काही पदार्थ आम्लधर्मी असल्याने किडनी रक्ताला आम्लारीधर्मी गुणधर्म प्राप्त करून देतात.
रक्तातून टाकाऊ पदार्थ वेगळे करण्याचे वृक्काचे प्रकार्यात्मक एकक म्हणजे नेफ्रॉन होय. प्रत्येक वृक्कामध्ये सुमारे १० लाख नेफ्रान्स असतात. किडनीचे कार्य अयोग्य पद्धतीने चालू असल्यास रक्ताचे कृत्रिमरीत्या शुद्धीकरण करण्यासाठी डायलिसीस या पद्धतीचा अवलंब केला जातो.
 किडनी स्टोन – किडनी स्टोन हा कॅल्शिअम ऑक्झ्ॉलेट या रासायनिक संयुगापासून बनलेला असतो.
यकृत (liver)
यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृतात अतिरिक्त झालेला ग्लुकोजचा साठा ग्लायकोजेनच्या स्वरूपात होतो व ग्लुकोजची गरज भासल्यास ग्जायकोजेनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये केले जाते. म्हणून यकृताला ‘ग्लुकोजचे कोठार / गोदाम’ असे म्हणतात. शरीरातील हानीकारक रासायनिक पदार्थाना बिनविषारी करणे. उदा. अमोनियाचे रूपांतर कमी विषारी असलेल्या युरियामध्ये करणे. तसेच अन्नातील विषारी घटक शोषून घेणे म्हणून यकृताला ‘तपासणी नाका’ असे म्हणतात. पित्तरस (्रु’ी) तयार करणे.
हृदय (Heart)
स्थान – मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुप्फुसांच्यामध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते. वजन- पुरुष ३४० ग्रॅम, स्त्री- २५५ ग्रॅम. कार्ये- हृदय हे रक्ताभिसरण संस्थेचे महत्त्वाचे इंद्रिय आहे. आकुंचन व प्रसरणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे. हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते.
हृदयाची रचना – मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अिलद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये डावी कर्णिका /अिलद (Left Autrium), उजवी कर्णिका /अिलद ((Right Autrium), डावी जवनिका/ निलय (Left Venricle),
उजवी जवनिका/ निलय (Right Venricle) हृदयाच्या आकुंचनाला २८२३’ी म्हणतात, तर हृदयाच्या प्रसरणाला ्िरं२३’ी म्हणतात.
हृदयाचे ठोके (Heart beats) – हृदयाचे आकुंचन व प्रसरणाचे एक चक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय. एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात. प्रौढ व्यक्तींमध्ये – ७२ ठोके/मिनीट, वृद्धांमध्ये- ६० ठोके/मिनीट,  हृदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी पेसमेकर नावाचे इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात.
ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी ईसीजीचा वापर केला जातो.
रक्तदाब (Blood Pressure)- रक्तदाब स्पीग्मो मॅमोमीटरमध्ये मोजतात.  साधारण रक्तदाब  = १२०/८०mm याचा अर्थ असा होतो की, उच्च रक्तदाब (High B.P) = १५०/९० े ऋ ऌॠ पेक्षा जास्त.  कमी रक्तदाब (Low B.P)= १००/६०mm of Hgपेक्षा कमी.
पहिले हृदय प्रत्यारोपण – ३ डिसेंबर १९६७मध्ये दक्षिण आफ्रिकेत ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केले. भारतातील पहिले हृदयाचे सफल प्रत्यारोपण डॉ. पी. वेणुगोपाल यांनी घडवून आणले.

रक्त
रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते – रक्तद्रव्य, रक्तपेशी
रक्तद्रव्य (plasma) – हा फिकट रंगाचा, नितळ काहीसा आम्लारिधर्मी (alkaline) द्रव असतो. रक्ताच्या एकूण आकारमानापकी ५५ टक्के आकारमान रक्तद्रव्याचे असते. त्यात सुमारे ९० % पाणी, ७ % प्रथिनांसारखे घटक आणि असेंद्रीय घटक असतात. फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन हे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत उपयोगी पडतात. रक्त रक्तवाहिन्यांमध्ये वाहत असताना गोठू नये यासाठी मदत करणारा हिपॅरिन नावाचा घटकसुद्धा रक्तद्रव्यामध्ये असतो. हे हिपॅरिन प्लीहेमधून स्रवत असते. (रक्तदान केल्यावर बाटलीत रक्त गोठू नये म्हणून त्यात सोडियम ऑक्झ्ॉलेट टाकतात.)
रक्तपेशी – रक्तपेशी तीन प्रमुख प्रकारच्या असतात- तांबडय़ा रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, रक्तपट्टिका.
*    तांबडय़ा रक्तपेशी – तांबडय़ा रक्तपेशी या आकाराने लहान, वर्तुळाकार आणि केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. त्या मध्यभागी दोन्ही बाजूंना अंतर्वक्र असतात. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये त्यांची संख्या ५०-६० लाख इतकी असते. त्यांच्यातील हिमोग्लबिनमुळे त्या तांबडय़ा रंगाच्या बनतात. तांबडय़ा रक्तपेंशीमधील हिमोग्लोबिनच्या साहाय्याने फुप्फुसाकडून मोठय़ा प्रमाणावर ऑक्सिजन शरीरातील ऊतींकडे वाहून नेला जातो. तांबडय़ा रक्तपेशींची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते आणि त्या सुमारे १२७ दिवस जगतात.
*    पांढऱ्या रक्तपेशी – पांढऱ्या रक्तपेशी आकाराने मोठय़ा, अमिबासदृश, केंद्रकयुक्त आणि रंगहीन असतात. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये पाच हजार ते दहा हजार पांढऱ्या रक्तपेशी असतात. पांढऱ्या रक्तपेशीचे पाच प्रकार असतात. बॅसोफिल, इओसिनोफिल, न्युट्रोफिल, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स.
कार्य – शरीराचे  रोगांपासून रक्षण करणे. नवीन पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती प्लीहा आणि अस्थिमज्जा यांमध्ये होते. जर रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या दहा हजार प्रति घनमिमीपेक्षा जास्त झाली, तर व्यक्तीला ल्यूकोसायटॉसिस नावाचा रोग होतो. जर रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या चार हजार प्रति घनमिमीपेक्षा कमी  झाली तर व्यक्तीला ल्यूकोपेनिया रोग होतो.
*    रक्तिबबिका / रक्तपट्टिका – रक्तपट्टिका अतिशय लहान आणि तबकडीच्या आकाराच्या असून रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये त्यांची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते. कार्य- रक्त गोठण्याची क्रिया सुरू करणे. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड इत्यादी रोगांमध्ये रक्तातील रक्तपट्टिकांचे प्रमाण कमी होते व रक्तस्राव होण्याचा धोका असतो.

मानवी डोळा
 निरोगी मानवी डोळ्यांमध्ये सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर २५ सेमी. इतके आहे.
दृष्टिदोष –
निकटदृष्टिता / ऱ्हस्वदृष्टी – या विकारामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो. त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते. उपाय – अंतर्वक्र िभगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते.
दूरदृष्टिता /  दीर्घदृष्टी – या विकारामध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते. उपाय – बहिर्वक्र िभगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते.
विषमदृष्टी / अिबदुकता – बुब्बुळाच्या किंवा िभगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो. हा दोष ऱ्हस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो. उपाय – दंडगोलाकार िभगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते.
    नेत्ररोग –
*    रंग आंधळेपणा – आनुवंशिक, बरा न होणारा रोग. सर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही. विशेषत: लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही. फक्त पुरुषांनाच होतो.
*    मोतीिबदू – डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रिभग धुसर किंवा अस्पष्ट बनतो. (उपाय – शस्त्रक्रिया करून हा दोष काढून टाकता येतो.)
*    काचिबदू – ४० ते ५० वर्षांच्या दरम्यान होते. नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबूळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचिबदू असे म्हणतात. डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.
*    शुष्कता – अ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.
*    डोळे येणे – विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग, हा आजार पावसाळ्यात जास्त प्रमाणात पाहावयास मिळतो.
डोळ्यांना रंगांची व प्रकाशाची जाण- मानवी डोळ्यातील दृष्टिपटल अनेक प्रकाश संवेदी पेशींनी बनलेले असते. या पेशी दोन प्रकार / आकाराच्या असतात – दंडाकार व शंकूकार.
*    दंडाकार पेशी – प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची / अंधुकतेची माहिती पुरवितात.
*    शंकू आकाराच्या पेशी – प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात व प्रतिमेच्या रंगाची माहिती मेंदूस पुरवितात. दंडाकार पेशी अंधुक प्रकाशाससुद्धा प्रतिसाद देतात, परंतु शंकूकार पेशींना अंधुक संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. यामुळे रंगांची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते.