तुम्हांला या पृथ्वीतलावर विशिष्ट प्रतिभा आणि क्षमतांसह आणलं गेलं आहे. त्या आजर्पयच्या इतर सर्व लोकांपासून तुम्हाला एकमेव आणि वेगळे बनवतात. तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तुमची विशिष्ट प्रतिभा आणि क्षमता याच्या सहाय्याने अनेक गोष्टी प्राप्त करता येतात. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता आणि ज्याचा आनंद घेऊ शकता अशी एक किंवा दोन कौशल्ये ओळखून वेगळी काढणे, त्यानंतर त्यात सवरेत्कृष्ट बनण्यावर लक्ष केंद्रित करणे हे तुमच्या आयुष्यातील महान लक्ष्यांपैकी एक आहे.
बास्केटबॉल खेळाडू मायकेल जॉर्डन एकदा म्हणाला, ‘‘प्रतिभा सगळ्यांकडे असते; पण क्षमतेसाठी कठोर परिश्रम लागतात.’ तर कवी लॉगफेलीने एकदा लिहिले होते, ‘सामान्य माणसाची महान शोकांतिका म्हणजे तो त्याच्यामध्ये असलेले संगीत तसंच ठेवून आयुष्याचा निरोप घेतो.’
नेपोलियन हिलने एकदा लिहिले की, ‘अमेरिकेत यश मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे, तुम्हाला खरोखर काय करायला आवडते ते शोधून काढणे आणि त्यानंतर ते करून चांगले यश मिळवणे.’
तुमच्यातील विशिष्ट प्रतिभा आणि तुम्ही जे करण्यासाठी विशेष योग्य आहात ते ओळखण्याचे आणि निश्चित करण्याचे काही मार्ग असे आहेत.
सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते ती करण्यात तुम्ही नेहमी सवरेत्कृष्ट आणि आनंदी असाल, तर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही ते पैशाशिवाय कराल. ते तुमच्यामधील सवरेत्कृष्ट ते बाहेर आणते. ते विशिष्ट काम करण्यात मग्न असताना तुम्हाला अतिशय समाधान आणि आनंद मिळतो.
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन,
पृष्ठे – २५६, मूल्य – २२५ रु.