News Flash

कर्मचारी निवड आयोगाची भाषांतरकार निवड परीक्षा

क र्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारच्या विविध कार्यालये आणि आस्थापनांमध्ये नेमण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ-भाषांतरकार निवड परीक्षा-२०१३ साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत

| August 19, 2013 08:27 am

क र्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारच्या विविध कार्यालये आणि आस्थापनांमध्ये नेमण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ-भाषांतरकार निवड परीक्षा-२०१३ साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी इंग्रजी व हिंदी विषयांसह पदवी परीक्षा व त्यानंतर हिंदी किंवा इंग्रजीमधील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी अथवा हिंदी-इंग्रजी-हिंदी अशा स्वरूपाचा पदव्युत्तर भाषांतर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा : ३० वर्षे. राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवड परीक्षा : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल व त्यामध्ये मुंबईचा समावेश असेल.
निवड परीक्षेत निर्धारित गुणांक  मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारेत्यांची निवड करण्यात येईल.
नेमणूक व वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध कार्यालये वा आस्थापनांमध्ये कनिष्ठ अनुवादक म्हणून नेमण्यात येईल. याशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदेपण देय असतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून विहित नमुन्यातील अर्जावर निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी १०० रु.ची रिक्रुटमेंट टपाल तिकिटे लावणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि रिक्रुटमेंट तिकिटांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई ४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१३.
हिंदी-इंग्रजीसह अनुवादविषयक पात्रताधारक विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा परीक्षा  उपयुक्त ठरू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 8:27 am

Web Title: staff selection commission examination of the interpreter
Next Stories
1 रोजगार संधी:
2 वर्तमान क्षणांचा आदर करा!
3 फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट
Just Now!
X