News Flash

बारावीनंतर काय?

बारावीनंतर प्रवेश घेता येईल अशा काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा येत्या काही दिवसांत पार पडणार असून त्यासंबंधित अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.

| October 28, 2013 07:27 am

बारावीनंतर प्रवेश मिळणाऱ्या काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा अथवा अर्ज दाखल करण्यासंबंधीच्या प्रक्रिया वेग धरू लागल्या आहेत. अशा काही अभ्यासक्रमांची आणि त्यांच्या प्रवेशप्रक्रियेची ओळख –
बारावीनंतर प्रवेश घेता येईल अशा काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा येत्या काही दिवसांत पार पडणार असून त्यासंबंधित अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. अशा काही अभ्यासक्रमांची ही सविस्तर ओळख-
स्पेशल क्लास रेल्वे अ‍ॅप्रेन्टिस
(रेल्वेचे मेकॅनिकल इंजिनीअर्स)
स्पेशल क्लास रेल्वे अ‍ॅप्रेंटिस (रेल्वेचे मेकॅनिकल इंजिनीअर्स) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर २०१३पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत १२ जानेवारी २०१४ रोजी जी देशभरातील विविध शहरांमध्ये परीक्षा घेतली जाईल. यामध्ये राज्यातील मुंबई आणि नागपूर या केंद्रांचा समावेश आहे.
स्पेशल क्लास रेल्वे अ‍ॅप्रेंटिस (रेल्वेचे मेकॅनिकल इंजिनीअर्स) या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना चार वर्षांचे प्रशिक्षण रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये दिले जाते. या कालावधीत निवडलेल्या उमेदवारांना मेकॅनिकल अभियांत्रिकीचे प्रशिक्षण इंडियन रेल्वे इन्स्टिटय़ूट ऑफ मेकॅनिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग या संस्थेत दिले जाते. ही संस्था मेस्त्रा- रांची स्थित बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम राबवते. चार वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर बीई- मेकॅनिकल इंजिनीअिरग ही पदवी प्रदान केली जाते. प्रशिक्षणाच्या काळात पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी दरमहा ९,१०० रुपये विद्यावेतन दिले जाते. ९,४०० रुपये विद्यावेतन तिसऱ्या वर्षांसाठी आणि चौथ्या वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांसाठी विद्यावेतन दिले जाते. चौथ्या वर्षांच्या उर्वरित सहा महिन्यांसाठी ९,७०० रुपये विद्यावेतन दिले जाते. या प्रशिक्षणाच्या कालावधीत उमेदवारांना लेखी आणि प्रात्यक्षिक दोन्ही प्रकाराचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. आठही सत्रे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामध्ये किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. यशस्वी उमेदवारांची भारतीय रेल्वे सेवेतील मेकॅनिकल इंजिनीअर्स विभागात १८ महिन्यांच्या प्रोबेशन कालावधीसाठी निवड केली जाते. प्रोबेशन कालावधी यशस्वीपणे पूर्ण केल्यावर मेकॅनिकल इंजिनीअर्स ऑफिसर्स या पदावर नियुक्त केले जाते. ही ‘ग्रुप ए’ची सेवा असून यामध्ये निर्धारित टप्प्याने वरिष्ठ पदे मिळत राहतात.
    पात्रता आणि अर्हता
स्पेशल क्लास रेल्वे अ‍ॅप्रेंटिसशिप या परीक्षेला बसू इच्छिणारा उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा आणि बारावीला त्याने गणिताचा आणि भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र या दोन विषयांपकी एका विषयाचा अभ्यास केलेला असावा. बारावीची परीक्षा प्रथम किंवा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी. गणित या विषयासह पदवी घेतलेले व रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र यापकी कोणत्याही एका विषयाचा अभ्यास केलेले विद्यार्थीसुद्धा या परीक्षेला बसू शकतात. यंदा बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीसुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१४ रोजी २१ वर्षांपेक्षा अधिक नसावे. उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९३ पूर्वी आणि १ जानेवारी १९९७ नंतर झालेला नसावा. अनुसूचित जाती आणि जमातीच्या संवर्गातील उमेदवारांसाठी वयात पाच वर्षांची सवलत आहे, तर इतर मागास वर्ग संवर्गातील उमेदवारांसाठी वयात तीन वर्षांची सवलत आहे. काही विशिष्ट अपंग संवर्गातील उमेदवारांना १० वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
दोन टप्प्यांत परीक्षा
स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिसशिपची परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येते. पहिला टप्पा लेखी परीक्षेचा असून त्याला ६०० गुण असतील. यामध्ये तीन प्रश्नपत्रिकांचा समावेश असेल.
* सामान्यक्षमता चाचणी (यात इंग्रजी, सामान्यज्ञान, मानसशास्त्रीय चाचणी यावर प्रश्न विचारले जातील.)
* भौतिकशास्त्र (यात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयावर प्रश्न विचारले जातील.)
* गणित. या प्रश्नपत्रिकेचा कालावधी प्रत्येकी दोन तास राहील.
या प्रश्नपत्रिका प्रत्येकी २०० गुणांच्या असतील. दुसरा टप्पा मुलाखतीचा असून त्यासाठी २०० गुण ठेवण्यात आले आहेत. निगेटिव्ह माìकग आहे. चुकलेल्या गुणांसाठी ०.३३ गुण कापले जातील. उमेदवाराने दोन उत्तरे दिली असल्यास व त्यापकी एक अचूक असले तरी ०.३३ टक्के गुण कपात केले जाईल. जर उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर त्या प्रश्नाचे गुण कापले जाणार नाहीत.
    शुल्क आणि इतर माहिती
परीक्षेचे शुल्क १०० रुपये आहे. हे शुल्क स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत रोख भरता येते. अनुसूचित जाती-जमाती आणि महिला उमेदवारांना शुल्क आकारले जाणार नाही.
स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिसशिप या परीक्षेला बसू इच्छिणारा विद्यार्थी आपला अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर जाऊन भरू शकतो. अर्ज ऑनलाइनच करणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरू नये. आयोगातर्फे सर्व प्रकारची माहिती ही ई-मेलद्वारे कळविण्यात येत असल्याने उमेदवाराने आपला अचूक ई-मेल देणे आवश्यक आहे. www.upscgov.in या वेबसाइटवर ई-अ‍ॅडमिशन प्रमाणपत्र पुरवले जाईल. ते उमेदवारांना डाऊनलोड करावे लागेल. पोस्टाने अ‍ॅडमिशन कार्ड पाठवले जात नाहीत.
पत्ता :
सेक्रेटरी, युनियन पब्लिक सíव्हस कमिशन, ढोलपूर हाऊस, नवी दिल्ली.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन या संस्थेने डिझायिनगच्या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडविणारी संस्था असा नावलौकिक निर्माण केला आहे. विविध विषयांमध्ये डिझाइनचे अभ्यासक्रम चालविणारी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन ही आपल्या देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील एकमेव संस्था होय. या अभ्यासक्रमांना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे. या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
 पदवी अभ्यासक्रम
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद या संस्थेतील पदवी या अभ्यासक्रमांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे. या अभ्यासक्रमांतर्गत पुढील तीन शाखांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.
* इंडस्ट्रिअल डिझाइन (प्रॉडक्ट/ फíनचर / इंटेरिअर डिझाइन, सिरॅमिक अ‍ॅण्ड ग्लास डिझाइन)
* टेक्सटाइल अ‍ॅण्ड अ‍ॅपेरल
* मीडिया डिझाइन (ग्राफिक/ अ‍ॅनिमेशन/ फिल्म अ‍ॅण्ड व्हिडीओ कम्युनिकेशन/ एक्झिबिशन)
प्रवेश प्रक्रिया
पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देशातील विविध केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर या केंद्रांचा समावेश आहे. परीक्षेमधून निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथे स्टुडियो टेस्ट आणि मुलाखतीसाठी एप्रिल / मेमध्ये बोलावले जाते. जूनच्या मध्यापासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला प्रारंभ होतो.
पत्ता : एनआयडी, पालडी, अहमदाबाद- ३८०००७ गुजरात, दूरध्वनी – ०७९- २६६२३६९२/ २६६२३४६२, फॅक्स : २६६२११६७
वेबसाइट :  www.nid.edu.   
ई-मेल- admissions@nid.edu
या अभ्यासक्रमांना अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०१३. डिझाइन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट १२ जानेवारी २०१४ साली घेण्यात येईल. अर्जाची किंमत १५०० रुपये. या रकमेचा डिमांड ड्राफ्ट नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन अहमदाबाद या नावे काढून पाठवा. राखीव संवर्गासाठी ७५० रुपये. डिझाइनचे प्रशिक्षण देणाऱ्या परदेशातील १६ संस्थांशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी विशेष कार्यक्रम सुरू केले आहेत.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ  फॅशन टेक्नॉलॉजी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या २०१४-१५च्या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. १० जानेवारीपर्यंत २०१४ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. १७ जानेवारी २०१४ पर्यंत वाढील शुल्क भरून अर्ज भरता येईल. मात्र त्यासाठी पाच हजार रुपये शुल्क भरावे लागेल. बॅचलर ऑफ डिझाइनसाठी आणि बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांसाठी ९ फेब्रुवारी २०१४ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेसाठी राज्यातील केंद्रे- मुंबई, पुणे आणि नागपूर. सिच्युएशन टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत एप्रिल ते मे २०१४ या कालावधीत घेण्यात येईल. शुल्क : खुला संवर्ग आणि इतर मागास वर्ग- क्रिमी लेअर- बाराशे रुपये. अनुसूचित जाती आणि जमाती आणि इतर मागास वर्ग नॉन क्रिमी लेअर- ६०० रुपये.
फॅशन क्षेत्राशी निगडित विविध विषयांचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी आपल्या देशातीलच नव्हे जगातील एक आघाडीची संस्था म्हणून इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने नावलौकिक कमावला आहे. या संस्थेला स्वत: पदवी प्रदान करण्याचा अधिकार १ एप्रिल २००७ पासून देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या अधिकार असलेली फॅशन विषयाचे शिक्षण देणारी ही जगातील एकमेव संस्था होय.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत चालविण्यात येणारे अभ्यासक्रम –
* बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन
* बॅचलर ऑफ डिझाइन इन लेदर डिझाइन
* बॅचलर ऑफ डिझाइन इन अ‍ॅक्सेसरी डिझाइन
* बॅचलर ऑफ डिझाइन इन टेक्सटाइल डिझाइन
* बॅचलर ऑफ डिझाइन इन निटवेअर डिझाइन
* बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन
* बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इन अ‍ॅपेरल प्रॉडक्शन
हे मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, गांधीनगर, हैदराबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता, पाटणा, भोपाळ, रायबरेली, शिलाँग येथील कॅम्पसमध्ये शिकवले जातात.
नवी मुंबई कॅम्पसमध्ये
*  बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन
*  बॅचलर ऑफ डिझाइन इन निटवेअर डिझाइन
* बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन
*  बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इन अ‍ॅपेरल   प्रॉडक्शन
*  बॅचलर ऑफ डिझाइन इन टेक्सटाइल डिझाइन हे अभ्यासक्रम शिकवले जातात.
 प्रत्येकी ३० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
अर्हता- बॅचरल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सोडून इतर सर्व पदवी अभ्यासक्रमासाठी अर्हता – कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण.
परीक्षेचा पॅटर्न- बॅचलर ऑफ डिझाइनच्या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी जनरल एबिलिटी टेस्ट, क्रिएटिव्ह एबिलिटी टेस्ट आणि सिच्युएशन टेस्ट असे तीन टप्पे आहेत. जनरल एबिलिटी टेस्टला ३० टक्के वेटेज, क्रिएटिव्ह एबिलिटी टेस्टला ५० टक्के वेटेज आणि सिच्युएशन टेस्टला आणि २० टक्के वेटेज दिले जाते.
बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी- इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत  बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जनरल एॅबिलिटी टेस्ट घेतली जाते. या टेस्टला १०० टक्के वेटेज देण्यात येते. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल एनआयएफटीच्या वेबसाइटवर घोषित केला जाईल आणि टपालाद्वारे यशस्वी उमेदवारांना कळविला जाईल.
मुंबई केंद्राचा पत्ता- एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट नंबर १५, सेक्टर नंबर ४, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०, दूरध्वनी-०२२-२७७४७००, २७७४५५४९, २७७४७१००, फॅक्स- २६५४२१५१
वेबसाइट- www.nift.ac.inकिंवा  http://applyadmission.net/nift 2014 ईमेल-  niftmumbaiacademics@gmail.com      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 7:27 am

Web Title: studies after h s c
Next Stories
1 नृत्यसाधना
2 वेंडिंग प्लॅनर
3 अडथळे म्हणजेच ध्येय
Just Now!
X