सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर आता तुमच्यासाठी बँकिंग क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक यासह विविध पदांसाठी भरती सुरु केली आहे. एकूण ३४७ पदांची भरती करण्यात येत आहे. यावेळी इच्छुक उमेदवारांनी unionbankofindia.co.in या लिंकद्वारे त्यांचा अर्ज भरू शकतात. तसेच ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत तुम्ही या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. रिक्त पदांसाठी काय तपशील असणार आहे कोणती पदे रिक्त आहेत? जाणून घेऊयात.

भरतीच्या महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ सप्टेंबर २०२१

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ३ सप्टेंबर २०२१

ऑनलाईन फी जमा करण्याची तारीख – १२ ऑगस्ट, २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१

पदांचा तपशील

वरिष्ठ व्यवस्थापक – ६० पदे

मॅनेजर- ६० पदे

मॅनेजर- ७ पदे

मॅनेजर- ७ पदे

मॅनेजर- २ पदे

मॅनेजर- १ पद

मॅनेजर- ५० पदे

मॅनेजर- १४ पदे

सहाय्यक व्यवस्थापक- २६ पदे

सहाय्यक व्यवस्थापक- १२० पदे

शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा

बँकेत काम करण्यासाठी उमेदवारांनी ६०% गुणांसह पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे, तसेच काही पदांवर पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेले उमेदवार आणि काही पदांसाठी संबंधित व्यापारात बीटेक पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादेबद्दल सांगायच झालं तर, या बँकिंग क्षेत्रात काही पदांसाठी २० ते ३० वर्षे, तसेच काही पदांसाठी २५ ते ३५ वर्षे आणि काही पदांसाठी ३० ते ४० वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या क्षेत्रात आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल अधिक माहिती या भरतीच्या अधिकृत http://www.unionbankofindia.co.in या लिंक द्वारे माहिती मिळवता येईल.

अर्ज शुल्क

या पदांवर अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. याकरिता सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क ८५० रुपये भरावे लागणार आहे. अर्जदारांच्या इतर सर्व श्रेणींसाठी अर्ज विनामूल्य आहे. अर्ज शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे जमा करता येऊ शकते.

असा करा अर्ज

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट http://www.unionbankofindia.co.in वर जाऊन तुम्ही अर्ज भरा. या लिंकवर गेल्यावर तुम्ही होम पेज वरच्या मुख्यपृष्ठावर करिअर सेक्शनवर जा. या सेक्शनवर तुम्हाला या भरतीची अधिकृत अधिसूचना मिळेल. यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची आणि अर्जाची लिंक देखील मिळेल.