प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेतील महत्त्वाचा पण काहीसा दुर्लक्षित असणारा घटक म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाची तयारी कशी करावी, याबाबत जाणून घेणार आहोत. या अभ्यासघटकांतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, कृषीशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश होतो. या घटकावर २०११ ते २०२० या कालावधीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पुढीलप्रमाणे —

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

वर्षे                प्रश्नसंख्या

२०११                 १९

२०१२                 ०९

२०१३                ११

२०१४                 १३

२०१५                 ७

२०१६                 ८

२०१७                 ४

२०१८                  १३

२०१९                 ११

२०२०                 ११

वरील कोष्टकावरून असे दिसते की या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या पाहता यूपीएससी पूर्वपरीक्षेकरिता सामान्य अध्ययनांतर्गत येणाऱ्या इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था या विषयांइतकेच महत्त्व सामान्य विज्ञान या घटकास आहे. तरीदेखील बहुतांश विद्यार्थी या घटकाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. याची कारणमीमांसा शोधताना एक बाब लक्षात येते. ती म्हणजे, या अभ्यासघटकाची व्याप्ती मोठी असणे होय.

या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात एनसीईआआरटीच्या क्रमिक पुस्तकांपासून करावी. या पुस्तकांद्वारे विज्ञानातील संकल्पना स्पष्ट होतात. यामुळे परीक्षेत संकल्पनेवर आधारित प्रश्नांची उकल करता येते. यानंतर बाजारात उपलब्ध असणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरचे कोणतेही एक पुस्तक वाचावे. शक्यतो अशा पुस्तकामध्ये जैवतंत्रज्ञान, अवकाश संशोधन, जेनेटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, दूरसंचार तंत्रज्ञान, संरक्षण इ. घटकांचा समावेश असावा. या विषयांमध्ये चालू घडामोडींवर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. याकरिता ‘बुलेटिन’, सायन्स रिपोर्टर ही मासिके आपल्याला उपयोगी ठरू शके ल. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक, स्मार्ट फोन यांच्या वापरामुळे आपले जीवन सुकर बनले आहे. म्हणूनच जर एखादी संकल्पना, नवे शोध, तंत्रज्ञान इ. बाबतची अद्ययावत माहिती घेण्यासाठी परीक्षार्थीनी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करणे श्रेयस्कर ठरते. उदा. इस्रो, डी.आर.डी.ओ, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय व पी.आय.बी. यांची संकेतस्थळे आपण नियमित पाहू शकतो.

या विषयाची तयारी करताना विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान असते, ते म्हणजे या विषयाशी संबंधित पुस्तके वाचल्यानंतरही परीक्षेमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येत नाही. परिणामी, हा विषय कसा हाताळायचा याबाबतीत कला शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसते. या विषयावर प्रभुत्व मिळवण्याकरिता मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे  विश्लेषण करावे व त्याआधारे अभ्यासाची रणनीती ठरवावी. या विषयावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांकडे पाहता असे दिसते की, या विषयामध्ये अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी कुठल्याही विशेष ज्ञानाची आवश्यकता नसते. असे प्रश्न कोणतीही शिक्षित व्यक्ती अगदी शास्त्रशाखेची पाश्र्वभूमी नसतानाही सोडवू शकते.

या पाश्र्वभूमीवर २०२० मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न पाहू.

प्र.१. खालील घडामोडींवर विचार करा.

(१)     शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी करणे.

(२) जिवंत ज्वालामुखीच्या मुखांचे निरीक्षण करणे.

(३) डी.एन.ए. विश्लेषणाकरिता समुद्रामध्ये फवारे सोडणाऱ्या व्हेल माशाच्या श्वासाचे नमुने गोळा करणे.

वरील घडामोडींमध्ये कोणता अभ्यास ड्रोनच्या वापरामुळे यशस्वीरीत्या पार पाडता येईल?

अशा प्रश्नांमधून प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा ‘अवेरनेस’ तपासला जातो. २०२० च्या प्रश्नपत्रिकांमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ब्लॉक चेन तंत्रज्ञान’ या चर्चेत असणाऱ्या तंत्रज्ञानावर प्रश्न विचारण्यात आले होते. दरवर्षी नोबेल पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर त्यातील शास्त्रशाखेशी संबंधित  संशोधनाविषयी अधिक जाणून घेणे श्रेयस्कर ठरेल.

सामान्य विज्ञानावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी विज्ञानातील मूलभूत संकल्पना जाणून घेणे श्रेयस्कर ठरेल. सामान्य विज्ञानामध्ये अंतर्भूत असणाऱ्या घटकांचे प्राधान्याने अध्ययन करणे आवश्यक आहे. यामध्ये भौतिकशास्त्रातील विविध नियम, सिद्धांत, उदा. ऑप्टिक्स, ध्वनी, चुंबकत्व, विद्युत, घनता इ. तर जीवशास्त्रामध्ये पचनसंस्था, प्रजननसंस्था, विविध प्रकारचे रोग, पेशींचे प्रकार, वनस्पतींचे वर्गीकरण, जनुकीय अभियांत्रिकी, जीवनसत्त्वे या बाबीविषयी माहिती द्यावी. रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाची रासायनिक संयुगे, खनिजे व त्यांचा आढळ, धातू व त्यांचे गुणधर्म, कार्बन व त्याची संयुगे, रोजच्या आयुष्यामध्ये होणारा रसायनशास्त्राचा वापर यांचा प्रामुख्याने अभ्यास करावा.