या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र शासनाची वृद्ध निराधार व्यक्तींसाठी दरमहा मोफत १० किलो धान्य वाटपाची अन्नपूर्णा योजना आहे.

पात्रता निकष

  • या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदाराचे वय ६५ वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असावे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेसाठी पात्र असलेली व्यक्ती अन्नपूर्णा योजनेसाठी तत्त्वत: पात्र असेल. तिला प्रत्यक्षात पेन्शन अथवा अर्थसाहाय्य मिळत नसावे तसेच अर्जदार निराधार असावा, म्हणजेच स्वत:च्या उपजीविकेसाठी त्याला स्वत:चे नियमित किंवा पुरेसे साधन नसावे किंवा त्याचे उत्पन्न अत्यल्प असावे.
  • कुटुंबातील इतर व्यक्तीकडून त्याला आर्थिक मदत मिळत नसावी. अर्जदार राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना किंवा संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी वृद्ध भूमिहीन शेतमजूर साहाय्य योजना अशा कोणत्याही निवृत्ती योजनेचा लाभ घेणारा नसावा.

लाभाचे स्वरुप

  • पात्र लाभार्थीला अन्नपूर्णा योजनेच्या पुरवठा पत्रिका देण्यात येतील. या पुरवठा पत्रिकेवर लाभार्थ्यांना दरमहा १० किलो धान्य मोफत दिले जाईल. त्यामध्ये ७ किलो गहू व ३ किलो तांदूळ किंवा १० किलो गहू किंवा १० किलो तांदूळ किंवा शासन पुरवठा करेल ते धान्य देण्यात येईल.
  • अर्ज करणे, छाननी, मंजुरी व कार्ड वाटप
  • अर्जदाराने ग्रामसेवक/ तलाठी/ प्रभाग अधिकारी/ मुख्याधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा. त्यांनी अर्जाची छाननी करून आपल्या शिफारशीसह तो तहसीलदारांकडे पाठवावा. ग्रामपंचायत, नगरपालिका, प्रभाग किंवा प्रभाग समिती त्यांच्या कार्यक्षेत्रातील पात्र वृद्ध निराधारांची, योजनेच्या लाभासाठी ठरावासह शिफारस करू शकेल.
  • अधिक माहितीसाठी : http://mahades.maharashtra.gov.in/ MPSIMS/ ViewSchemeProfile.do?OWASP_CSRFTOKEN=null&mode=printProfile&recordId=1025&planyearId=2016
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annapurna yojana for older persons
First published on: 15-07-2017 at 01:15 IST