जेव्हा कोणी जखमी होते किंवा अचानक आजारी पडते, जेव्हा संकटकालीन परिस्थिती असते. त्या वेळी प्रथमोपचार देण्याची वेळ येते आणि हीच वेळ रोग्यासाठी महत्त्वाची असते. खाली काही आवश्यक प्रथमोपचार दिले आहेत.

सामान्य औषधे

  • तुमच्या घरात प्रथमोपचार साहित्य आहे याची खात्री करून घ्या. त्यात काही सामान्य औषधे तयार ठेवा.
  • प्रथमोपचार साहित्य आणि औषधे मुलांपासून दूर ठेवा.

आवश्यक सूचना

  • रोग्याला वाचवताना प्रथम तुम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवा. घडणाऱ्या प्रसंगाकडे बघून काय पाऊल उचलायचे ते ठरवा. जेव्हा शक्य असेल तेव्हा रक्तापासून वा शरीरातील द्रव्यापासून स्वसंरक्षणासाठी हातमोजे घाला.
  • बिकट प्रसंगी रोग्याची जीभ टाळूला अडकलेली नाही किंवा काही वस्तू त्यात अडकलेली नाही याची खात्री करून घ्या. त्याचा श्वासोच्छ्वास स्वच्छपणे चालू राहायला हवा. श्वासोच्छ्वास नीट चालू नसेल तर त्याला कृत्रिम श्वास देण्याची लगेच गरज असते.
  • त्याला रक्त येत असेल तर त्याचा रक्तप्रवाह आणि हृदयाचा ठोकादेखील संथ आहे हे पाहा. जर रक्तप्रवाह जोरात असेल, त्याने विष प्यायले असेल किंवा त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाले असतील तर त्वरित धावपळ करा. अशा वेळी प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे.
  • हे फार महत्त्वाचे आहे की, ज्या माणसाच्या मानेवर किंवा पाठीवर आघात झाले असतील त्याला मुळीच हलवू नका. जर त्याला वांती झाली तर त्याला कुशीवर झोपवा आणि त्याला गरम ठेवण्यासाठी एखादे पांघरुण घाला.
  • तुम्ही प्रथमोपचार देत असताना वैद्यकीय मदतीसाठी कोणाला तरी बोलवायला पाठवा. डॉक्टरला गंभीरतेची परिस्थिती समजावून सांगा आणि रुग्णवाहिका येईपर्यंत काय प्रथमोपचार करावेत हे त्यांना विचारून घ्या.