राज्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना सर्व स्तरावर मोफत शिक्षण देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेखाली शिक्षण शुल्क, प्रवेश शुल्क, प्रयोगशाळा शुल्क व परीक्षा शुल्क यांची प्रतिपूर्ती करण्यात येते.

योजनेच्या प्रमुख अटी

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Palghar, teachers election training,
पालघर : निवडणूक प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची तारांबळ, मुल्यांकन चाचणी व निवडणूक प्रशिक्षण एकाच वेळेत
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
  • इयत्ता १० वीपर्यंत सर्वाना नि:शुल्क शिक्षण देण्याची योजना कार्यान्वित असल्याने या योजनेचा लाभ उच्च माध्यमिक स्तर व तत्सम अभ्यासक्रमाखालील अनुदानित इतर लाभार्थी तसेच पदवी/पदव्युत्तर स्तरावरील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी/ विद्यार्थिनींना देण्यात येतो.
  • व्यावसायिक अभ्यासक्रमाखाली अनुदानित तसेच विनाअनुदानित शिक्षण संस्थेत मुक्त जागी प्रवेश घेतलेल्या शिक्षकांच्या पाल्यांनाही फीची प्रतिपूर्ती प्रमाणित दराने करण्यात येते.
  • या योजनेचा लाभ दोन पाल्यांना होतो.
  • महाराष्ट्र राज्यातील मान्यता प्राप्त संस्थेतील अभ्यासक्रम फक्त ग्राह्य धरण्यात येतील.

आवश्यक कागदपत्रे

  • जिल्हास्तरावरील योजना आहे.

सदर कागदपत्राची पडताळणी जिल्हास्तरावर करण्यात येते. यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे

  • विहित नमुन्यात अर्ज (दोन प्रतीत)
  • महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • विहित नमुन्यात नोकरीचे प्रमाणपत्र

अर्ज प्रक्रिया

  • शाळेत प्रवेश घेतल्यानंतर १ महिन्याच्या आत सवलतीबाबत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक
  • त्या कागदपत्रासह शाळेमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
  • शिक्षणाधिकारी (माध्यमिक) याच्या मागणीनुसार आवश्यक तरतूद संगणक प्रणालीवर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या मार्फत वितरित करण्यात येते.

अधिक माहितीसाठी:  https://mahaschemes.maharashtra.gov.in/mr/edgucation%20and%20sports%20department.html