भारतीय नौसेना – नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन एन्ट्री स्कीम (पी.सी.) (एनएआयसी) कोर्स – जून २०१७

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पात्रता – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन, इन्स्ट्रमेंटेशन, आयटी, केमिकल, मेटॅलर्जी, एअरोस्पेस या विषयांतील अभियांत्रिकी पदवी किमान ६०% गुण (पहिल्या ५ सेमिस्टपर्यंत)

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुल १९९२ आणि १ जानेवारी १९९८ दरम्यानचा असावा.

उंची – १५७ सें.मी., वेतन – रु. ९०,०००/- सीटीसी. ७५ लाखांचे विमा संरक्षण.

निवड पद्धती – एसएसबी मुलाखत डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७. २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी. ऑनलाइन अर्ज  http://www.joinindiannavy.gov.in वर दि. ९ डिसेंबर २०१६ पर्यंत करावा. ऑनलाइन अर्जाची प्रत ‘पोस्ट बॉक्स नं. २, सरोजिनी नगर पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली – ११० ०२३’ या पत्त्यावर साध्या पोस्टाने पाठवावी.

मध्य रेल्वे- मुंबई अंतर्गत खेळाडूंसाठी २६ जागा-

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९ ते २५ नोव्हेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वेची जाहिरात पहावी अथवा मध्य रेल्वेच्या http://www.rrccr.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०१६.

सेंट्रल सिल्क बोर्ड, बंगलोर येथे वरिष्ठ कारकुनांच्या ३६ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १२ ते १८ नोव्हेंबर २०१६ च्या अंकातील सेंट्रल सिल्क बोर्डची जाहिरात पहावी अथवा बोर्डाच्या http://www.csb.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०१६.

सैन्यदलामधील तांत्रिक पदवीधर प्रशिक्षण योजना, सैन्यदल शिक्षण योजना व बारावी उत्तीर्णाना प्रवेश या योजनांतर्गत विविध संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख

७ डिसेंबर २०१६

संरक्षण मंत्रालयांतर्गत असिस्टंट आर्किटेक्टच्या ७ जागा-

अर्जदार आर्किटेक्चरमधील पदवीधर असावेत व त्यांची कौंसिल ऑफ आर्किटेक्चरकडे नोंदणी झालेली असायला हवी. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ८ ते १४ ऑक्टोबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर जनरल (पर्सोनेल) मिलिटरी इंजिनीअर सव्‍‌र्हिसेस, इंजिनिअर इन चीफ ब्रँच, इंटिग्रेटेड एचक्यू ऑफ एमओडी (आर्मी) काश्मीर हाऊस, नवी दिल्ली- ११००११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०१६.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities
First published on: 06-12-2016 at 05:36 IST