या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय वायुदलात इंजिनीअर्ससाठी संधी-

अर्जदारांनी बीई/ बीटेक पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.

वयोमर्यादा २४ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ ते ९ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी अथवा वायुदलाच्या http://www.careerairforce.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जून २०१७.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी

विद्यापीठ परभणी येथे वरिष्ठ संशोधन सहाय्यक (कृषी शाखा) पदाच्या १० जागा तर वरिष्ठ संशोधन साहाय्यक (अन्नतंत्र शाखा) पदाच्या ३ जागा.

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ- परभणीची जाहिरात अथवा विद्यापीठाच्या  http://mkv2.mah.nic.in अथवा www.vnmkv.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कुलसचिव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी- ४३१४०२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जून २०१७.

आयकर विभागात खेळाडूंसाठी साहाय्यक व कर साहाय्यकांच्या २८ जागा –

अर्जदार पदवीधर असावेत व त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत विशेष कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली आयकर विभागाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स (हेडक्वार्टर्स पर्सोनेल), रूम नं. ३७८, सी.आर. बिल्डिंग, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली ११०००२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जून २०१७.

केंद्रीय माहिती विभागात वरिष्ठ माहिती अधिकारी पदाच्या ७२ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या  http://www.upsc.gov.in किंवा   http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जून २०१७.

मिनरल एक्स्पोरेशन कॉर्पोरेशन, नागपूर अंतर्गत व्यवस्थापक (भूगर्भशास्त्र) पदाच्या ११ तर सहव्यवस्थापक (भूगर्भशास्त्र) पदाच्या ४ जागा- 

वयोमर्यादा अनुक्रमे ४५ व ४० वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ ते ९ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली मिनरल एक्स्पोरेशन कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी. एमईसीएलच्या दूरध्वनी क्र. ०७१२- २५१०३१० वर संपर्क साधावा अथवा कंपनीच्या  www.mecl.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१७.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities
First published on: 24-06-2017 at 01:19 IST