कंट्रोलर ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स (अ‍ॅम्युनेशन), खडकी- पुणे येथे कनिष्ठ कारकुनांसाठी संधी-

अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान व व्हॉलिबॉल, कॅरम व टेबल टेनिस यांसारख्या क्रीडा विषयातील नैपुण्य आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली कंट्रोलर ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स (अ‍ॅम्युनेशन), संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कंट्रोलरेट ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स, संरक्षण मंत्रालय, खडकी- पुणे- ४११००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जून २०१७.

कंट्रोलरेट क्वालिटी अ‍ॅशुरन्स (स्पेशल व्हेईकल), देहू रोड येथे स्टेनोग्राफर म्हणून संधी-

अर्जदार बारावी उत्तीर्ण व लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी ट्रान्सक्रिप्शनची ५० शब्द प्रतिमिनिट व हिंदी ट्रान्सक्रिप्शनची ६५ शब्द पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली कंट्रोलरेट क्वालिटी अ‍ॅशुरन्स, देहू रोडची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि कंट्रोलर, कंट्रोलरेट ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स, स्पेशल व्हेईकल्स, देहू रोड, पुणे- ४१२१०१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जून २०१७.

नॅशनल इनिस्टटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, माळेगाव- बारामती येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी थेट मुलाखत-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंटची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या – www.niam.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. सविस्तर अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क -असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, माळेगाव- बारामती, जि. पुणे- ४१३११५ येथे १ जुलै २०१७ रोजी सकाळी ११ वाजता.

अलाहाबाद उच्च न्यायालयात वैयक्तिक साहाय्यकांच्या २५० जागा –

अर्जदार पदवीधर व लघुलेखनातील पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ४० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रातील प्रकाशित झालेली अलाहाबाद उच्च न्यायालयाची जाहिरात पाहावी अथवा www.allahabadhighcourt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०१७.

सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट (जनरल स्टोर्स), शाहजहानपूर येथे टेक्निशियनच्या ३१ जागा-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असायला हवेत. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंटची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरन्स ऑफिसर, एसक्यूएई (जीएस) शाहजहानपूर २४२००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जून २०१७.

संरक्षण मंत्रालयांतर्गत सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, मुंबई येथे कनिष्ठ कारकुनांच्या ५ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी अथवा सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, मुंबईच्या www.ncs.gov.in अथवा www.indianarmy.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१७.