या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (गृह मंत्रालय) 

(१) ‘असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (स्टेनो)’ च्या एकूण ६९ पदांची भरती. (पुरुष – यूआर- २८, इमाव – १३, अजा – ७, अज – १६ महिला – यूर्आ – ४, इमाव – १)

पात्रता – १२ वी उत्तीर्ण  ८० श.प्र.मि. शॉर्टहँड स्पीड.

वयोमर्यादा – दि. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ ते २५ वष्रे (इमाव – २८ वष्रे, अजा/अज – ३० वष्रे). उंची – पुरुष – १५६ सें.मी. (अज -१६२.५ सें.मी.), महिला – १५५ सें.मी. (अज – १५० सें.मी.) छाती – पुरुष ७७ते ८२ सें.मी. (अज – ७६ ते ८१ सें.मी.)

परीक्षा शुल्क – रु. १००/- (महिला/अजा/अज/विकलांग यांना फी माफ). विहित नमुन्यातील अर्ज (अनेक्स्चर-१) ‘डीआयजी, सीआयएसएफ(वेस्टर्न झोन -१) सीआयएसएफ काँप्लेक्स, डब्ल्यूझेड-१ एचक्यू, सेक्टर – ३५, खारघर, नवी मुंबई – ४१० २१० या पत्त्यावर दि. २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

अ‍ॅटॉमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी, मुंबई, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जीमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती. (जाहिरात क्र. एईईएस/०१/२०१७)

(१) ट्रेण्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – हिंदी/संस्कृत (इमाव-४), गणित/फिजिक्स (अज-१), केमिस्ट्री/बायोलॉजी (यूआर-१) पात्रता – संबंधित विषयांतील पदवी किमान ५०% गुणांसह  बी.एड.  सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (पेपर-२) उत्तीर्ण.

(२) टीजीटी – आर्ट (यूआर-२) फिजिकल एज्युकेशन टीचर (पुरुष (इमाव – १), महिला (यूआर- २). पात्रता – पदवी किमान ५०% गुण  बी.पी.एड.  इंग्रजी माध्यमातून शिकविण्याचे कौशल्य.

(३) लायब्ररियन – (इमाव -३ पदे)लायब्ररी सायन्समधील पदवी किंवा कोणत्याही शाखेची पदवी किमान ५०% गुण  एक वर्ष कालावधीचा लायब्ररी सायन्समधील पदविका. इंग्रजी/हिंदी माध्यमातून शिकविण्याचे कौशल्य.

(४) प्रायमरी टीचर (अज – ४, इमाव – १४, यूआर- १०). पात्रता – १० वी किंवा १२वी किमान ५०% गुण.  सीटीईटी (पेपर-१) उत्तीर्ण. १२ वीला इंग्रजी विषय अनिवार्य.  इंग्रजी/हिंदी माध्यमातून शिकविण्याचे कौशल्य.

(५) प्रायमरी टीचर (म्युझिक) – (अजा – २, इमाव -३, यूआर – १). पात्रता -१० वी किंवा १२ वीला किमान ५०% गुण.  संगीतामधील पदवी किमान ५०% गुण. इंग्रजी/हिंदी माध्यमातून शिकविण्याचे कौशल्य.

(६) प्रिपरेटरी टीचर – (अजा – १, अज – ३, इमाव – १, यूआर -२). पात्रता – १०वी किंवा १२ वीला किमान ५०% गुण. ईसीसीएड्/एनएसटी/पीपीटीटीमधील पदविका किमान ५०% गुण. १२ वीला इंग्रजी विषय अनिवार्य.  इंग्रजी/हिंदी माध्यमातून शिकविण्याचे कौशल्य.

वयोमर्यादा – दि. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी १,२,३ साठी ३५ वष्रे. ४,५,६ साठी ३० वष्रे.

परीक्षा केंद्र – मुंबई (कोड नं. २४). परीक्षा शुल्क – रु. ७५०/- (अजा/अज/विकलांग यांना फी माफ). विहित नमुन्यातील अर्ज http://www.aees.gov.in  या संकेतस्थळावरून पिंट्रआऊट काढून घ्यावी. पूर्ण भरलेले अर्ज

आणि अ‍ॅडमिट कार्ड डिमांड ड्राफ्ट सोबत

‘चिफ अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अ‍ॅटॉमिक

एनर्जी एज्युकेशन सोसायटी, सेंट्रल ऑफिस, वेस्टर्न सेक्टर, अणुशक्ती नगर, मुंबई – ४०० ०९४’ या पत्त्यावर दि. १७ फेब्रुवारी २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, (HBCSE), मुंबई, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (डिम्ड विद्यापीठ) पीएच.डी. प्रोग्राम इन सायन्स एज्युकेशन-२०१७ साठी प्रवेश.

पात्रता – एमएस्सी. (कोणत्याही विषयात)/एमए/एमटेक/ एमएसडब्ल्यू/एमएड

परीक्षा शुल्क – रु. ६००/- गणित आणि विज्ञानाचे शिक्षकसुद्धा पात्र आहेत. त्यांना किमान दोन र्वष HBCSE मध्ये शिकावे लागेल. त्यानंतर संशोधनाचे काम त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी करावे लागेल.

शिष्यवृत्ती दरमहा रु. २५,०००/- रजिस्ट्रेशनपर्यंत त्यानंतर रु. २८,०००/-  ३०% एचआरए वार्षकि इतर खर्चासाठी रु. ३२,०००/- पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा – मुंबई, पुणे इ. केंद्रांवर दि. १४ मे २०१७

रोजी होईल. मुलाखत जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात होईल. ऑनलाइन अर्ज  http://www.hbcse.tifr.res.in/admissions   या संकेतस्थळावर दि. १५ मार्च २०१७ पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities employment opportunities employment job
First published on: 14-02-2017 at 05:08 IST