दिल्ली सबअॉर्डीनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (जाहिरात क्र. ०४/१७) डायरोक्टरेट ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ NCT ऑफ दिल्ली अंतर्गत पुढील एकूण ९,२३२ शिक्षक पदांच्या भरतीसाठी दोन स्तरांवर परीक्षा घेणार आहे. रिक्त पदांचा तपशील –
१) स्पेशल एज्युकेशन टीचर – ६०५ पदे,
२) असिस्टंट टीचर (नर्सरी) – ३२० पदे,
३) असिस्टंट टीचर (प्रायमरी) – १,३९४ पदे,
४) फिजिकल एज्युकेशन टीचर – ९१९ पदे,
५) ड्रॉइंग टीचर – २९५ पदे,
६) डोमेस्टिक सायन्स टीचर – १९९ पदे,
७) पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (ढॅळ),
८) ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर (ळॅळ),
९) कॉम्प्युटर सायन्स टीचर,
१०) एज्युकेशनल अॅण्ड व्होकेशनल गाइडन्स काऊंसिलर इ.
परीक्षा केंद्र – दिल्लीमधील असतील. परीक्षा फी – रु. १००/-(महिला/अजा/अज/विकलांग/माजी सनिक यांना फी माफ.)
वयोमर्यादा – ढॅळ साठी ३६ वष्रेपर्यंत, ळॅळ साठी ३२ वष्रेपर्यंत, इतर पदांसाठी – ३० वष्रेपर्यंत.
पात्रतेसाठी विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ६ जानेवारी, २०१८ च्या अंकात पहावी.
ऑनलाइन अर्ज www.dsssb.delhigovt.nic.in या संकेतस्थळावर दि. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत करावे.
कॅनरा बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ची भरती एकूण पदे ४५० (अजा – ६७, अज – ३५, इमाव – १२१, यूआर – २२७)
मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सíव्हसेस प्रा.लि. (एमजीईएसपीएल), बेंगळुरू किंवा NITTE एज्युकेशन इंटरनॅशनल प्रा.लि., मंगलुरू येथे १ वर्ष कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अॅण्ड फायनान्स (पीजीडीबीएफ) कोर्स (९ महिने क्लासरूम स्टडीज आणि ३ महिने कॅनरा बँकेच्या ब्रँच / ऑफिसमध्ये इंटर्नशीप) मार्फत.
पीजीडीबीएफ कोर्स फी – एमजीईएसमध्ये रु. ४,१३,०००/-, एनआयटीटीईमध्ये – ३,५४,०००/- निवडलेल्या उमेदवारांना कोर्स फी दोन हप्त्यांतसुद्धा भरता येईल. पहिला हप्ता अॅडमिशनच्या वेळी, दुसरा हप्ता २/३ महिन्यांपर्यंत.
कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या उमेदवारांची कॅनरा बँकेत ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-१वर प्रोबेशनरी ऑफिसर पदावर नेमणूक केली जाईल.
ऑनलाइन लेखी परीक्षेचा दिनांक ४ मार्च, २०१८.
पात्रता – पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज /विकलांग उमेदवारांसाठी ५५% गुण.)
वयोमर्यादा – २० ते ३० वष्रेपर्यंत
(जन्म दि. २ जानेवारी, १९८८ ते १ जानेवारी, १९९८ दरम्यानचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वष्रेपर्यंत, अजा/अज – ५ वष्रेपर्यंत.)
परीक्षा शुल्क – रु. ७०८/- (अजा/अज/विकलांग – रु. ११८/-.)
ऑनलाइन अर्ज http://www.canarabank.com/english/careers/recruitment/ या संकेतस्थळावर क्लिक करून दि. ३१ जानेवारी, २०१८ पर्यंत करावेत.
एनटीपीसी लिमिटेडमध्ये इंजिनीअर्ससाठी संधी
एनटीपीसी लिमिटेड आपल्या ४९ पॉवर स्टेशन्ससाठी विभागवार ‘१५० इंजिनीअिरग एक्झिक्युटिव्ह ट्रेनीज्’ची भरती गेट – २०१८ च्या स्कोअरवर आधारित करणार आहे.
१) इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग – ३५ पदे.
२) मेकॅनिकल इंजिनीअिरग – ५५ पदे.
३) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग – २० पदे,
४) इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअिरग – २० पदे,
५) मायिनग इंजिनीअिरग – २० पदे.
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअिरग पदवी किमान सरासरी ६५% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/विकलांग – ५५% गुण) (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, जर ते ६५% गुणांची अट पूर्ण करू शकतील.) संबंधित विषयातील गेट-२०१८ स्कोअर.
स्टायपेंड – एक वर्षांच्या ट्रेिनग दरम्यान रु. २४,९००/- च्या बेसिक पेवर डीए व इतर भत्ते मिळून स्टायपेंड दिले जाईल.
वेतन – पे स्केल रु. २४,९००/- ३% – ५०,५००/- (जे १ जानेवारी २०१७ पासून वाढणार आहे.) मध्ये डीए आणि इतर भत्त्यांसह दिले जाईल.
वयोमर्यादा – दि. ३१ जानेवारी २०१८ रोजी २७ वष्रेपर्यंत. (इमाव – ३० वष्रे, अजा/अज – ३२ वष्रे, विकलांग – ३७/४०/४२ वष्रेपर्यंत)
निवड पद्धती – ग्रॅज्युएट अॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअिरग (जीएटीई) – २०१८ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार ऑनलाइन बिहेवियरल/अॅप्टिटय़ूड टेस्ट/जीडी/इंटरव्ह्यूसाठी निवडले जातील.
(गेट-२०१८ च्या गुणांना ८५% वेटेज जीडीतील गुणांना ५% वेटेज आणि इंटरव्ह्यूच्या गुणांना १०% वेटेज दिले जाईल.) गेट-२०१८ च्या माहितीसह (रजिस्ट्रेशन नंबर). ऑनलाइन अर्ज www.ntpccareers.net या संकेतस्थळावर दि. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत करावे.