* भारतीय नौदलात अविवाहित पुरुष उमेदवारांना स्टूअटर्स, शेफ्स आणि हायजिनिस्ट्स बनण्यासाठी एप्रिल, २०१८ पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी प्रवेश.
पात्रता – १०वी उत्तीर्ण.
वय – उमेदवाराचा जन्म १ एप्रिल, १९९७ ते ३१ मार्च, २००१ दरम्यानचा असावा.
प्राथमिक ट्रेिनग दरम्यान दरमहा रु. १४,६००/- स्टायपेंड दिले जाईल. ट्रेिनग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना डिफेन्स पेमॅट्रिक्स लेव्हल ३ वर तनात केले जाईल. (रु. २१,७००/- ४३,१००/-) अधिक रु. ५,२००/- एमएसपी डी.ए.
निवड पद्धती – लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी (पीएफटी) आणि वैद्यकीय तपासणी. लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाइप असेल. ज्यात विज्ञान/गणित आणि सामान्यज्ञान विषयांवर आधारित प्रश्न. कालावधी ४५ मिनिटे. पेपर हिंदी, इंग्रजी अशा दोन्ही भाषांत छापण्यात येतील.
शारीरिक क्षमता चाचणी – १.६ कि.मी. ७ मिनिटांत धावणे, २० उठाबशा, १० पुशअप्स.
उंची – १५७ सें.मी. (अज उमेदवारांना उंचीत सूट.)
छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.
प्रशिक्षण – १५ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाई.
ऑनलाइन अर्ज <http://www.joinindiannavy.gov.in/> या संकेतस्थळावर ९ जुल, २०१७ पर्यंत करावेत.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, गांधीनगर, गुजरात येथे पुढील पदांची भरती.
(१) ज्युनियर अकाऊंट (१० पदे).
पात्रता – बी.कॉम. २ र्वष कामाचा अनुभव.
(२) ज्युनियर असिस्टंट (१४ पदे). पात्रता – पदवी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील २ र्वष कामाचा अनुभव.)
(३) ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट (९ पदे). पात्रता – मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/केमिकल/
कॉम्प्युटर सायन्स इ. मधील इंजिनीअिरग पदवी किंवा इंजिनीअिरग पदविका १ वर्षांचा अनुभव किंवा आयटीआय ६ वर्षांचा अनुभव.
(४) ड्रायव्हर (२ पदे). पात्रता – बारावी किंवा आयटीआय हलकी/जड वाहने चालविण्याचा परवाना.
(५) ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट (४ पदे).
पात्रता – १०वी आयटीआय २ वर्षांचा कामाचा अनुभव.
वयोमर्यादा – सर्व पदांसाठी २७ वष्रे.
परीक्षा शुल्क – रु. २००/- (महिला/अजा/अज यांना फी माफ.)
ऑनलाइन अर्ज <http://www.iitgn.ac.in/> या संकेतस्थळावर दि. ५ जुल २०१७ पर्यंत करावेत.
* मुंबई विद्यापीठ, प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमी, जे.पी. नाईक भवन, पहिला मजला, रू.नं. ४, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई – ४०००९८ येथे यूपीएससी/एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश.
पात्रता – पदवी पूर्ण.
प्रवेशपूर्व परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ३१ जुलपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेशपूर्व परीक्षा १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. घेण्यात येईल.संपर्कासाठी दूरध्वनी क्र.
०२२-२६५४३५४७/२६५३०२०८.