महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे तर्फे पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी राज्यातील मुस्लीम, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, पारसी व जैन या अल्पसंख्याक समाजातील १ ली ते १० वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. केंद्र सरकारच्या या मॅट्रिकपूर्व शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या २०१६-१७ या शैक्षणिक सत्रासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक पात्रता-
अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत-
* उमेदवार वर नमूद केलेल्या अल्पसंख्य समाजातील व राज्यातील शासनमान्य शैक्षणिक संस्थांमध्ये १ ली ते १० वीचे शिक्षण घेणारे असायला हवेत.
* इयत्ता १लीचे विद्यार्थी सोडल्यास इतरांनी गेल्या वर्षीच्या परीक्षेत कमीत कमी ५०% गुण मिळविलेले असावेत.
* अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न वार्षिक १ लाखाहून अधिक नसावे.
* एका कुटुंबातून २ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
* या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इतर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळू शकणार नाही.
* यापूर्वी सदर शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिष्यवृत्ती योजनेचे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

अधिक माहिती व तपशील : शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, दूरध्वनी क्र. ०२०- २६१२३५१५ वर संपर्क साधावा अथवा राज्याच्या अल्पसंख्याक व प्रौढशिक्षण संचालनालय, पुणेच्या http://www.scholarship.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१६ आहे.

श्री बृहद् भारतीय समाजातर्फे शिष्यवृत्ती
श्री बृहद् भारतीय समाज, मुंबईतर्फे देशांतर्गत विविध विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या
हुशार विद्यार्थ्यांना २०१६-१७ या शैक्षणिक सत्रासाठी देण्यात येणाऱ्या विशेष शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.
समाविष्ट विषयांचा तपशील- हुशार व गरजू विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेमध्ये एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी, संगणकशास्त्र, कृषी, पशुरोगचिकित्सा, नर्सिग, शिक्षणशास्त्र इ. विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक पात्रता-
* अर्जदार विद्यार्थ्यांनी त्यांची संबंधित पात्रता परीक्षा कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. फार्मसी विषयातील अर्जदार विद्यार्थ्यांसाठी गुणांच्या टक्केवारीची अट ४५% पर्यंत शिथिलक्षम आहे.
* अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६०,००० रु. हून अधिक नसावे व अर्जदार इतर कुठल्याही शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावेत. शिष्यवृत्ती देताना संबंधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर भर देण्यात येईल.

अधिक माहिती व तपशील- वरील शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली श्री बृहद् भारतीय समाज, मुंंबईची जाहिरात पाहावी अथवा समाजाच्या दूरध्वनी क्र. ०२२- २२०२०११३ वर संपर्क साधावा.
अर्ज व माहितीपत्रक- विहित नमुन्यातील अर्ज हवे असतील तर उमेदवारानी श्री बृहद् भारतीय समाज, एन. के. मेहता इंटरनॅशनल हाऊस, १७८ बॅक बे रेक्लमेशन, बाबुभाई एम चिनॉय मार्ग, एलआयसी योगक्षेमच्या मागे, चर्चगेट, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर संपर्क साधावा.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज वरील पत्त्यावर ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.