केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे देशांतर्गत महिला संशोधकांना विज्ञान व तंत्रज्ञान विषयांतर्गत प्रगत संशोधनाची संधी देण्यासाठी किरण योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे संशोधनपर संधी उपलब्ध आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार महिलांनी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान असायला हवे.

वयोगट- अर्जदार महिला संशोधकांचे वय २७ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असायला हवे.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची राष्ट्रीय पद्धतीवर संगणकीय पद्धतीने निवड चाचणी घेण्यात येईल. या निवड चाचणीत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे दिल्ली येथे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

नेमणूक व पाठय़वृत्ती- निवड झालेल्या उमेदवारांना विज्ञान व तंत्रज्ञान मंडळातर्फे पुणे, दिल्ली, चेन्नई व खडगपूर येथे संशोधनपर प्रत्यक्ष सराव कामासाठी नेमण्यात येईल व त्यादरम्यान त्यांना खालीलप्रमाणे संशोधनपर शिष्यवृत्ती देण्यात येईल.

एमएस्सी, बीटेक, एमबीबीएस पात्रताधारक संशोधक उमेदवार : दरमहा रु. २०,००० रु.

एमफिल, एमटेक, एमफार्म, एमव्हीएससी पात्रताधारक संशोधक उमेदवार- दरमहा २५,००० रु.

संबंधित विषयातील पीएचडी पात्रताधारक उमेदवार- दरमहा ३०,००० रु.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- वरील योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० डिसेंबर- ५ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची जाहिरात पाहावी. मंत्रालयाच्या दूरध्वनी क्र. ०११-४२५२५८०२ वर संपर्क साधावा अथवा http://www.pfc.org.in/  या संकेतस्थळाला भेट द्यावी.अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख  १९ जानेवारी २०१८ आहे.