कोल्हापूर येथील राज्य सरकारच्या भारतीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या राज्यातील उमेदवारांच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणक्रम आयोजित केला जातो. २०१६ साली आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्राची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध जागा
या प्रशिक्षण सत्रातील उपलब्ध जागांची संख्या ८० असून त्यामध्ये अल्पसंख्यांक आयोगातर्फे अनुदानित १० तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था- बार्टी,
पुणे द्वारा अनुदानित १० जागांचा समावेश आहे.
वयोमर्यादा
अर्जदार खुल्या संवर्गातील असल्यास त्यांचे वय १ ऑगस्ट २०१६ रोजी ३२ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार राखीव आहे.
निवड पद्धती
अर्हताप्राप्त उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा कोल्हापूर येथे १० जानेवारी २०१६ रोजी घेण्यात येईल. अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व लेखी निवड परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे त्यांची प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी
३०० रु. (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी १५० रु.) भारतीय स्टेट बँक अथवा स्टेट बँकेच्या सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती
या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली कोल्हापूरच्या भारतीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राची जाहिरात पाहावी. केंद्राच्या दूरध्वनी क्र. ०२३१- २५२८३५१ वर संपर्क साधावा अथवा ६६६.स्र््र३ू‘’ँंस्र्४१.१ॠ.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २६ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत. ल्ल ल्ल
आवश्यक पात्रता
उमेदवार महाराष्ट्र राज्याचे अधिवासी व कुठल्याही विषयाचे पदवीधर असायला हवेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2015 रोजी प्रकाशित
स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनपर प्रशिक्षणवर्ग
लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या राज्यातील उमेदवारांच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणक्रम
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
First published on: 21-12-2015 at 08:10 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition test guidelines training class