असम रायफल्समध्ये शिपाई पदाच्या ६२,३९० जागा
या उपलब्ध जागांपैकी महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांची संख्या ३,०६१ असून अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत तसेच ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणे अत्यावश्यक मानले जाते. वयोमर्यादा २३ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://ssconline2.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २३ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

मंगलोर रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्समध्ये कुशल कामगारांच्या ९२ जागा
अर्जदार विज्ञान विषयातील पदवीधर अथवा केमिकल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. त्यांना रासायनिक उद्योग क्षेत्रातील कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली मंगलोर रिफायनरीची जाहिरात पाहावी अथवा रिफायनरीच्या http://www.mrpl.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २३ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

पश्चिम-मध्य रेल्वेत खेळाडूंसाठी ५ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी हॉकी वा क्रिकेट यांसारख्या क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २२ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली पश्चिम-मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज द डिव्हिजनल मॅनेजर (पी), पश्चिम-मध्य रेल्वे, हबिबगंज, भोपाळ-४८२०२४ या पत्त्यावर २५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिटय़ूट – राजमहेंद्री येथे कृषितज्ज्ञांसाठी ११ जागा
उमेदवारांनी अ‍ॅग्रॉनॉमी, कृषी-अभियांत्रिकी,
पशु-वैद्यक, गृह-विज्ञान, फलोत्पादन, रोप-विकास, भू-विज्ञान, संगणकशास्त्र यांसारख्या विषयातील पदव्युत्तर परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली आयसीएआर- सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिटय़ूटची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, आयसीएआर- सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिटय़ूट, डॉ. एन. सी. गोपालाचारी मार्ग, श्रीरामनगर पोस्ट ऑफिस, राजमहेंद्री, आंध्र प्रदेश- ५३३१०५  या पत्त्यावर २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन – खडकवासला, पुणे येथे छायाचित्रकारांच्या २ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी छायाचित्रकारिता अथवा फाइन आर्ट्समधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ जानेवारी- ६ फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली जलस्रोत मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला, पुणे- ४११०२४ या पत्त्यावर २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.