navi-sandhiमध्य रेल्वे- नागपूर येथे खेळाडूंसाठी ४ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. त्यांनी बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक वा जलतरण यासारख्या क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वे, नागपूरची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशीलासह आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज सीनिअर डिव्हिजनल पर्सोनेल ऑफिसर, डीआरएम ऑफिस- मध्य रेल्वे, किंग्ज-वे, नागपूर- ४४०००१ या पत्त्यावर १६ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात चालकांच्या ४७२ जागा
उमेदवार शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांच्याजवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना असावा आणि ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाच्या http://www.itbpolice.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज इन्स्पेक्टर जनरल, फ्रंटियर हेडक्वार्टर्स, आयटीबी पोलीस, पोस्ट ऑफिस- सीमा नगर, एअरपोर्टजवळ, चंदिगड- १६०००३ या पत्त्यावर १७ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

एअर इंडिया चार्टर्समध्ये एअरलाइन अटेंडंटच्या २३१ जागा
उमेदवार कुठल्याही विषयातील पदवीधर अथवा बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट व कॅटिरग टेक्नॉलॉजीमधील पात्रताधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २४ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली एअर इंडिया चार्टर्स लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा http://www.airindiaexpress.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १७ फेब्रुवारी २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

भारतीय हवाई दलात खेळाडूंसाठी संधी
अर्जदार बारावी उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांनी अ‍ॅथलेटिक्स, क्रॉस कंट्री, फुटबॉल, हॅण्डबॉल, नेमबाजी, व्हॉलीबॉल, भारोत्तोलन, बास्केटबॉल, क्रिकेट, जिम्नॅस्टिक, कबड्डी, वॉटर पोलो, मुष्टियुद्ध, सायकलिंग, हॉकी, लॉन टेनिस, जलतरण यासारख्या क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २१ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली हवाई दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज सेक्रेटरी, एअरफोर्स स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, ४१२, एअरफोर्स स्टेशन, रेस कोर्स, नवी दिल्ली- ११० ००३ या पत्त्यावर १८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल- पशुवैद्यकांसाठी ३९ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. याशिवाय त्यांनी पशुवैद्यक शास्त्र विषयातील निमवैद्यकीय पात्रता पूर्ण केलेली असावी.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाची जाहिरात पाहावी अथवा आयटीबीपीच्या http://www.itbpolice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल (नॉर्थ ईस्ट), फ्रंटियर हेड क्वार्टर्स, आयटीबी पोलीस, ओल्ड सेक्रेटरिएट बिल्डिंग, छावणी, जी. एस. रोड, शिलाँग- ७९३००१, मेघालय या पत्त्यावर  २३ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

जहाज वाहतूक मंत्रालयात लाइट हाऊस अटेंडंटच्या २८ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इलेक्ट्रिशियन अथवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक यांसारखी पात्रता प्राप्त केलेले असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २२ जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली जहाज वाहतूक मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टोरेट ऑफ लाइट हाऊसेस अ‍ॅण्ड लाइटशिप्स, जहाज वाहतूक मंत्रालय, ‘दीप भवन’, पं. नेहरू मार्ग, जामनगर- ३६१००८ या पत्त्यावर १८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.