येत्या १० ऑगस्टपासून रामनारायण रुईया महाविद्यालयात चिनी, स्पॅनिश, जर्मन आणि जपानी भाषांचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत.  या वर्गाचे शिकवणी शुल्क माफक ठेवण्यात आले असून दर रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत हे परदेशी भाषा वर्ग होतील. भाषा शिकवण्यासाठी संबंधित भाषांच्या तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. अभ्यासाचे साहित्य विद्यार्थ्यांना विनामूल्य दिले जाईल.  या भाषावर्गाना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशअर्ज वरिष्ठ महाविद्यालयातील एसएमएएफ काऊंटरवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी मृदुला गोखले – ९९६०८१४९११, प्रसाद भिडे – ९०२९१५०००१ यांच्याशी संपर्क साधावा. अथवा prasad_bhide@yahoo.co.in या पत्त्यावर ईमेल पाठवावा.