scorecardresearch

पदवीधरांसाठी SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; १६७३ जागांसाठी भरती तर पगार ६० हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या अधिक तपशील

स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.

पदवीधरांसाठी SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; १६७३ जागांसाठी भरती तर पगार ६० हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या अधिक तपशील
स्टेट बँक ऑफ इंडिया पीओच्या एकूण १६७३ जागांवर भरती केली जाणार आहे. (प्रातिनिधिक फोटो)

SBI PO Vacancy: स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार पीओच्या एकूण १६७३ जागांवर भरती केली जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. यासाठी, उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच २२ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  • अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जावे
  • वेबसाइटच्या होम पेजवर Whats New च्या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स ऑनलाइन फॉर्म 2022 फॉर 1673 पोस्ट’ या लिंकवर जा.
  • आता ‘क्लिक हिअर तो अप्लाय’ या पर्यायावर जा.
  • पुढील पानावर विचारलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • तुम्ही नोंदणी क्रमांकाद्वारे अर्ज भरू शकता.
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

BARC Recruitment : भाभा अणु संशोधन केंद्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिन्याला मिळणार ५५ हजारांहून अधिक पगार

एसबीआय पीओ भरती २०२२

  • अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू – २२ सप्टेंबर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर
  • प्राथमिक परीक्षा – १७ ते २० डिसेंबर २०२२

पात्रता आणि वय

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. त्याच वेळी, अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त आणि ३० वर्षांपेक्षा कमी असावे. या रिक्त पदावर निवड झालेल्या उमेदवारांना पगार म्हणून ६३,८४० रुपये प्रति महिना वेतन मिळेल. याशिवाय त्यांना अनेक प्रकारच्या भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Golden job opportunity in sbi for graduates recruitment for 1673 vacancies vacancy salary above 60k know more details state bank of india pvp

ताज्या बातम्या