mpscजगाच्या लोकसंख्येपकी एकूण १६ टक्के लोक भारतात राहतात व भारताच्या लोकसंख्येचा भाग हा युवा गटात मोडतो. या दृष्टीने भारताची लोकसंख्या ही समस्या नसून तिच्याकडे ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’  म्हणून पाहण्याचा कल वाढत आहे. या लोकसंख्येचा लाभ देशाच्या विकासाकरता व्हावा याकरता या लोकसंख्येचे कुशल मनुष्यबळामध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. या दृष्टीने मनुष्यबळ विकास ही देशाच्या प्रगतीसाठी मूलभूत गरज ठरते. या लेखामध्ये ‘मानवी संसाधन विकास’ घटकाच्या अभ्यासाची चर्चा करूयात.
या घटकातील मूळ संकल्पना आहे मनुष्यबळाचा विकास. मनुष्यबळाची कल्पना आधी समजून घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ‘उत्पादक व कुशल मनुष्यबळ’ ही संकल्पना लक्षात घ्यावी. ‘कार्यकारी’ लोकसंख्या म्हणजे मनुष्यबळ असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. यासाठी आधी लोकसंख्येची वैशिष्टय़े समजून घ्यायला हवीत. जनगणना २०११ अहवालाचा अभ्यास कशा प्रकारे करावा याची चर्चा यापूर्वीच आपण केली आहे. देशाची व महाराष्ट्राची  २००१ सालची जनगणनासुद्धा या दृष्टीने महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या मुद्दय़ांबाबत   २००१ व २०११ सालच्या स्थितीची तुलना करणारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. २००१ व २०११ सालचा तुलनात्मक तक्ता केल्यास हे मुद्दे लक्षात ठेवणे सोपे जाईल. रोजगाराबाबतच्या संकल्पना, व्याख्या समजून घ्यायला हव्यात. मागे चर्चा केल्यानुसार त्यातील तथ्यात्मक बाबी, आकडेवारी व टक्केवारीचा अभ्यास केलेला असल्यास त्याची विश्लेषणात्मक अभ्यासात मदत होते.
मनुष्यबळ विकासाची गरज व आवश्यकता याकडे राष्ट्रीय तसेच व्यक्तिगत दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमामध्ये मनुष्यबळ विकासाचे चार मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत- शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास. यापकी पहिल्या दोन मुद्दय़ांचा विचार या लेखामध्ये करूया.

आरोग्य
या घटकामध्ये पोषण, स्वच्छता, रोगनिवारण, नियंत्रण तसेच आरोग्य सुविधा या मुद्दय़ांचा विचार आवश्यक आहे. या घटकात आणि जीवशास्त्र विषयाच्या अभ्यासात बरेचसे साम्य आहे. जीवशास्त्रामधील पोषण व रोगनिवारण या घटकांचा व्यवस्थित अभ्यास गरजेचा आहे. मानवी वाढीसाठी आवश्यक ठरणारी पोषक खनिजे, जीवनसत्त्वे इत्यादींची गरज, स्रोत, त्यांच्या अभावाने होणारे रोग यांची टिपणे तक्त्यामध्ये काढता येतील. याव्यतिरिक्त महत्त्वाचे संसर्गजन्य रोग, साथीचे रोग, त्यांची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार व असल्यास त्यांच्या निवारणासाठीच्या शासकीय योजना व त्यांचे स्वरूप अशा सर्व मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आशा, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, उषा, इंद्रधनुष्य अभियान इत्यादींचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे.
स्वच्छतेसंबंधीची सद्य:स्थिती आíथक पाहणी अहवालामधून अभ्यासता येईल. या दृष्टीने ‘स्वच्छ भारत योजना’, महाराष्ट्रातील ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना’, ‘निर्मल ग्राम योजना’ इत्यादींचा मागील लेखांमध्ये सांगितल्यानुसार आढावा घेणे आवश्यक आहे.
महिलांचे व बालकांचे आरोग्य, पोषणाचे महत्त्व, त्याबाबतचे विविध अहवाल व आकडेवारी समजून घ्यावी. मागील लेखात चर्चा केल्यानुसार, माता मृत्यूदर, अर्भक व बालमृत्यूदर इत्यादी तथ्यात्मक बाबींचा आढावा आíथक पाहणी अहवालामधून घ्यावा. यात माता-बालकांच्या आरोग्यविषयीच्या विविध योजनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
शिक्षण
सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार करताना मूल्ये व नीतीतत्त्वे जोपासण्यामध्ये शिक्षणाची महत्त्वाची भूमिका असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ मनुष्यबळ विकासच नव्हे तर मानवी हक्कांची अंमलबजावणीही शिक्षणाच्या माध्यमातून होते. याबाबत चिंतन व विश्लेषणात्मक अभ्यास करावा. देशातील शिक्षणप्रणालींचा अभ्यास करताना याबाबत विविध आयोगांच्या शिफारसी व त्यानुसार शिक्षणप्रणालीमध्ये करण्यात आलेले बदल याची व्यवस्थित नोंद घ्यायला हवी.
शासनाच्या आजवरच्या सर्व शैक्षणिक धोरणांचा आढावा घेणे आवश्यक आहे. पूर्वप्राथमिक ते उच्च शिक्षण स्तरापर्यंतच्या प्रवेशप्रक्रिया, प्रवेशपरीक्षा, कालावधी, परीक्षापद्धती याबाबत गेल्या दोन वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या शासकीय निर्णयांची माहिती  असणे अपेक्षित असते.
शिक्षणपद्धती
औपचारिक, अनौपचारिक व प्रौढ शिक्षण या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. अनौपचारिक व प्रौढ शिक्षणाची गरज, स्वरूप, परिणाम, समस्या व उपाय इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. याबाबतच्या विविध योजना व संस्थांचा आढावा घेणे संयुक्तिक ठरते.
प्रत्यक्ष शिक्षणपद्धतीमधील समस्या- विद्यार्थ्यांची गळती, शिक्षणाचा दर्जा, शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे स्वरूप, कारणे, परिणाम व उपायांचा अभ्यास गरजेचा आहे. विशेषत: जागतिकीकरणाचे व खासगीकरणाचे शिक्षणपद्धतींवर झालेले सकारात्मक व नकारात्मक परिणाम समजून घ्यायला हवेत. यासाठी वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, इंटरनेट आदी माध्यमांतील चर्चा ऐकणे-पाहणे उपयोगी ठरते. यामध्येच ई-अध्ययन ही संकल्पना समाविष्ट करावी. ई-अध्ययन उपलब्ध असलेल्या संस्था माहिती असाव्यात तसेच या शिक्षणपद्धतीचे फायदे व तोटे समजून घ्यावेत.
‘मानवी हक्क’ या घटकाचा अभ्यास करताना वेगवेगळ्या व्यक्तिगटांच्या शिक्षणविषयक समस्या लक्षात घ्यायला हव्यात. महिला, अपंग, सामाजिकदृष्टय़ा व आíथकदृष्टय़ा मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक व आदीम जमाती यांच्या शिक्षणाच्या समस्या, त्यांची कारणे,  असल्यास घटनात्मक तरतुदी, आरक्षण, शासकीय योजना व त्यांचे मूल्यमापन अशा सर्व मुद्दय़ांचा संकल्पना व तथ्यांच्या विश्लेषणाद्वारे अभ्यास करणे आवश्यक ठरते. शिक्षणापासून वंचित राहिल्यास या विशिष्ट वर्गावर होणारे परिणामसुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे.
मानव संसाधन विकासातील पुढील मुद्दय़ांबाबतची चर्चा पुढच्या लेखामध्ये करूयात.

What does the UNICEF report say about child malnutrition
जगभरात अन्न दारिद्रय वाढतेय? बालकांच्या कुपोषणाबद्दल युनिसेफचा अहवाल काय सांगतो?
monsoon delayed reason
पाऊस नेमका आहे कुठे? देशभरात मान्सून कधी सक्रिय होणार?
women mps decreased in lok sabha 2024 poll
विश्लेषण : महिला आरक्षणानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक…तरीही महिला खासदारांची संख्या घटली! 
protection of minority rights in article 15 of indian constitution zws
संविधानभान : अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण
BJP vote share increased in South India
दक्षिणेत भाजपचा मतटक्का वाढला, पण जागा तितक्याच… तामिळनाडूत मात्र स्टॅलिन एके स्टॅलिनच!
Elections in more than 80 countries in 2024 India Loksabha Election 2024
यावर्षी तब्बल ८० देशांमध्ये होत आहे निवडणूक; भारतातील निवडणूक सर्वांहून वेगळी का?
wheat, production, import,
देशात यंदा गव्हाच्या उत्पादनात घट, तूर्त आयातीची शक्यता कमी
wheat, production, import,
देशात यंदा गव्हाच्या उत्पादनात घट, तूर्त आयातीची शक्यता कमी