scorecardresearch

Indian Army Recruitment 2022 : दहावी बारावी झालेल्यांना भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रिया सुरु

भारतीय सैन्याने मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, अहमदनगर येथे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

indian army
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी आहे.

Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यासाठी भारतीय सैन्याने मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MIRC), अहमदनगर येथे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आचारी, धोबी, सफाई कर्मचारी, न्हावी आणि एलडीसी या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक असणारे तसेच योग्य उमेदवार भारतीय सैन्याचे अधिकृत संकेतस्थळ indianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी आहे.

उमेदवार या लिंकद्वारे इंडियन आर्मी मुख्यालय एमआयआरसी भर्ती २०२२ अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ४५ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.

भारतीय सैन्य भरती २०२२ साठी रिक्त जागा तपशील

आचारी – ११ (युआर – ७, एससी – १, ओबीसी – २, ईडब्ल्यूसी – १)

धोबी – ३ (युआर – ३)

सफाई कर्मचारी (एमटीएस) – १३ (युआर – ८, एससी – १, ओबीसी – ३, ईडब्ल्यूसी – १)

न्हावी – ७ (युआर – ५, एससी – १, ओबीसी – १)

एलडीसी (मुख्यालय) – ७ (यूआर – ५, एससी – १, ओबीसी – १)

एलडीसी (एमआईआर) – ४ (यूआर – ३, ओबीसी – १)

भारतीय सैन्य भरती २०२२ साठी वेतन

आचारी आणि एलडीसी – १९,९०० – ६३,२०० रुपये (सातव्या सीपीसी पे मॅट्रिक्सनुसार स्तर २)

अन्य – १८,००० – ५६,९०० रुपये (सातव्या सीपीसी पे मॅट्रिक्सनुसार स्तर १)

भारतीय सैन्य भरती २०२२ साठी पात्रता निकष

आचारी – उमेदवार दहावी उत्तीर्ण झालेला असून त्याला भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान असावे.

धोबी – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

सफाई कर्मचारी (एमटीएस) – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा.

न्हावी – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

एलडीसी – उमेदवार बारावी उत्तीर्ण असण्यासोबतच संगणकावर इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे.

भारतीय सैन्य भरती २०२२ साठी वयोमर्यादा

सामान्य आणि ईडब्ल्यूसी – १८ ते २५ वर्षे

ओबीसी – १८ ते २८ वर्षे

एससी/एसटी – १८ ते ३० वर्षे

भारतीय सैन्य भरती २०२२ साठी निवड प्रक्रिया

या पदांसाठी लेखी चाचणी, प्रात्यक्षिक आणि कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian army recruitment 2022 golden opportunity for 10th and 12th passed application process started pvp