मानसशास्त्र विषयक पदव्युत्तर अभ्यासक्रम

एमफिल अभ्यासक्रमाच्या २०१६ सालासाठीच्या शैक्षणिक सत्राची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

रांची येथील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॅट्री येथे उपलब्ध असणाऱ्या पीएच.डी व एमफिल अभ्यासक्रमाच्या २०१६ सालासाठीच्या शैक्षणिक सत्राची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

क्लिनिकल सायकॉलॉजीतील संशोधनपर पीएचडी- जागा ४.
आवश्यक शैक्षणिक अर्हता- अर्जदारांनी मेडिकल अ‍ॅण्ड सोशल सायकॉलॉजी अथवा क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एमफिल केलेले असावे. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा.

सायकॉलॉजीमधील एमफिल- जागा १२.
आवश्यक शैक्षणिक अर्हता- अर्जदारांनी मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

सायकॅॅट्रिक सोशल वर्कमधील एमफिल- उपलब्ध जागा १२.
आवश्यक शैक्षणिक अर्हता- अर्जदारांनी समाजशास्त्र, सामाजिक कार्य यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
वरील सर्व अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असणाऱ्या एकूण जागांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत. राखीव गटातील अर्जदारांसाठी गुणांच्या टक्केवारीची अट पाच टक्क्य़ांनी शिथिलक्षम आहे.

निवड पद्धती
अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांनाच निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. त्यांच्या पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश
देण्यात येईल.

अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जदारांनी अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ४०० रु. चा (राखीव गटातील उमेदवारांनी ३०० रु. चा) डायरेक्टर सीआयपी- रांची यांच्या नावे असणारा व रांची येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठवणे
आवश्यक आहे.

अधिक माहिती
अभ्यासक्रमांबाबत अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॅट्री, रांचीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.cipranchi.nic.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २२ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत. आवश्यक ती कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्टसह प्रवेश अर्ज डायरेक्टर, सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ सायकिअ‍ॅट्री, रांची, झारखंड या पत्त्यावर ३० डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Information about postgraduate psychology courses