नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे एमफिल व पीएच.डी. अभ्यासक्रम :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, नवी दिल्ली येथे उपलब्ध असणाऱ्या एमफिल, संशोधनपर पीएच.डी. व अंशकालीन पीएच.डी. करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमांची पाश्र्वभूमी- संस्थेच्या संशोधनपर एमफिल व पीएच.डी. अभ्यासक्रमांचा मुख्य उद्देश केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक धोरण, नियोजन व त्यानुषंगाने आवश्यक प्रशासनिक क्षेत्रात काम करणे आहे.

अर्हता- अर्जदारांनी सामाजिक शास्त्र वा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ५०%) उत्तीर्ण केलेली असावी. अथवा ते या पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा व त्यांना संशोधनपर कामात रुची असायला हवी.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर १८ जून २०१६ रोजी घेण्यात येईल.

अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांची संबंधित अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्यात येईल.

शिष्यवृत्ती- निवड झालेल्या ‘नेट’ पात्रताधारक व निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन कालावधीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क-अर्जासह सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी २०० रु. (राखीव गटातील उमेदवारांसाठी १०० रु.) संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती-एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा युनिव्हर्सिटीच्या www.nuepa.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याची मुदत- आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज रजिस्ट्रार, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, १७-बी, श्री अरविंदो मार्ग, नवी दिल्ली- ११००१६ या पत्त्यावर १३ मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

 

ग्रामविकास विषयक पदविका अभ्यासक्रम

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पंचायतीराज, हैद्राबाद येथे एक वर्ष कालावधीचा ग्रामीण विकास विषयातील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

शैक्षणिक अर्हता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा ते पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.

निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे परीक्षा केंद्राचा समावेश आहे.

उमेदवारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार प्रवेश देण्यात येईल.

अधिक माहिती : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी इन्स्टिटय़ूटच्या www.nird.org.in/ pgdrdm या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याची मुदत : अर्ज आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह को-ऑर्डिनेटर (अ‍ॅडमिशन), सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अ‍ॅण्ड डिस्टन्स एज्युकेशन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पंचायतीराज, राजेंद्रनगर, हैद्राबाद- ५०० ०३० या पत्त्यावर १८ मे २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

 

डायरेक्टोरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंटतर्फे विनामूल्य प्रशिक्षण

केंद्र सरकारच्या नवी दिल्ली येथील डायरेक्टरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंटतर्फे देशभरातील विविध केंद्रांवर अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींच्या बारावी/पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी  विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

  • स्टायपेंडरी कोचिंग : विषय- इंग्रजी, सामान्यज्ञान, टायिपग आणि शॉर्टहँड.

कालावधी- ११ महिने. पुस्तकांसाठी रु. १,००० अनुदान, हे प्रशिक्षण १ जुल २०१६ रोजी सुरू होणार.

अर्हता- बारावी उत्तीर्ण (इंग्रजी विषयासह). वयोमर्यादा- २७ वष्रे.

  • १ वर्ष कालावधीचा ‘ओ’ लेव्हल कॉम्प्युटर प्रशिक्षण DOEACC/NIELIT मार्फत.

अर्हता- बारावी उत्तीर्ण (इंग्रजी विषयासह पदवीधर उमेदवारांना प्राधान्य).

वयोमर्यादा- १८-३० वष्रे. कोचिंग  १ जुल २०१६ रोजी सुरू होणार.

  • एक वर्ष कालावधीचा कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स प्रशिक्षण ‘ओ’ लेव्हल DOEACC/NIELIT मार्फत.

पात्रता- बारावी/आयटीआय उत्तीर्ण. प्रशिक्षण १ ऑगस्ट २०१६ पासून सुरू होणार. वरील तिन्ही अभ्यासक्रम विनामूल्य असतील. शिवाय महिना रु. ५०० प्रमाणे स्टायपेंड दिले जाईल.

अर्ज सबरिजनल एम्प्लॉयमेन्ट ऑफीसर, कोचिंग विथ गायडन्स सेंटर ऑफ एससी/एसटी, न्यू अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग नं. १  पाचवा मजला, जिल्हा परिषद प्रीमायसेस, सिव्हिल लाइन्स, नागपूर- ४४०००१ या कार्यालयातून घेऊन पूर्ण भरलेले अर्ज एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज नोंदणी कार्ड आणि शैक्षणिक/ जातीचे प्रमाणपत्रासह (मूळ आणि स्वयंसाक्षांकीत प्रत.) अभ्यासक्रम सुरू होण्याच्या तारखेच्या १ महिना आधी दाखल करावेत. (अभ्यासक्रम क्र. १ व २ साठी ३१ मे २०१६  पर्यंत आणि अभ्यासक्रम क्र. ३ साठी ३० जून २०१६ पर्यंत अर्ज पाठवावेत.

 

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथीचा पदवी अभ्यासक्रम

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथी, कोलकोता येथील बीएचएमएस या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची माहिती पुढीलप्रमाणे आहे-

एकूण जागा- ९३. त्यापैकी ६३ जागा प्रवेश पात्रता परीक्षेद्वारा भरल्या जातील.

शैक्षणिक अर्हता- अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व इंग्रजी या विषयांसह व किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण ( राखीव गटातील उमेदवारांसाठी ४५%)असावी.

वयोमर्यादा- अर्जदारांचे वय २५ वर्षांहून अधिक नसावे.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्र उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर १२ जून २०१६ रोजी होईल त्यात मुंबई केंद्राचा समावेश आहे. अर्जदारांची बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल.

अर्जासह पाठवायचे शुल्क- प्रवेशअर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १००० रुपयांचा डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथीच्या नावे असणारा व कोलकाता येथे देय असेलला डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.

अर्जाचा तपशील- ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.nih.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याची मुदत- आवश्यक ती कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्टसह अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथी, ब्लॉक जीई, सेक्टर- ३, साल्ट लेक, कोलकाता ७००१०६ या पत्त्यावर १६ मे २०१६ पर्यंत पोहोचेल असा पाठवावा.

Web Title: Information on national university courses
First published on: 09-05-2016 at 01:01 IST