इस्रो-लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरने लाइट व्हेइकल चालक, कुक, फायरमॅन आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्जदार लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर (LPSC) नोकरी अधिसूचना २०२१ साठी ०६ सप्टेंबर २०२१  पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे अवजड वाहन चालकाची २ पद, हलक्या वाहन चालकांची २ पद, कुकची १ पद, फायरमनची २ पद आणि कॅटरिंग अटेंडंटचचं १ पद अशी भरती होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे पात्रता?

पात्रतेबद्दल बोलताना, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SSLC/SSC/मॅट्रिक (इयत्ता १० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जड वाहन चालकास किमान ५  वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा. यामध्ये अवजड वाहन चालवण्याचा ३ वर्षे आणि हलके वाहन चालविण्याचा २ वर्षे अनुभव उमेदवारास असावा. हलक्या वाहन चालकाला ३ वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव असावा. कुक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला चांगल्या हॉटेल किंवा कँटीनमध्ये ५  वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro notification 2021 10th pass can apply for post salary upto 63200 per month check more details ttg
First published on: 27-08-2021 at 11:53 IST