नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अधिकृत वेबसाइटवर जेईई मेन २०२२ सत्र-२ ची उत्तर की जारी केली आहे. एनटीएने पेपर १ (BA/BTech), पेपर २ए (BArch) आणि पेपर २बी (B प्लॅनिंग) साठी उत्तर कीसह प्रश्नपत्रिका आणि रिस्पॉन्स शीट जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन उत्तर की तपासू किंवा डाउनलोड करू शकतात.

उत्तर की कशी डाउनलोड करायची?

  • उत्तर की पाहण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
  • येथे जेईई मुख्य उत्तर की २०२२ च्या लिंकवर क्लिक करा.
  • आता पुढील पानावर अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख इत्यादी लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  • आता जेईई मेन्स २०२२ सत्र १ परीक्षेची उत्तर की तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • ही उत्तर की डाउनलोड करा किंवा सेव्ह करा.

IBPS PO 2022 Exam: बँक पीओच्या ६०००हून अधिक पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या अर्ज करायची शेवटची तारीख

gaming sports
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोर्चा आता ऑनलाईन गेमिंगकडे, इन्फ्लुअन्सर्सची भेट घेऊन केली ‘या’ विषयावर चर्चा
chittaranjan locomotive works clw recruitment 2024 for 492 apprentice posts
CLW Bharti 2024: ‘चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स’मध्ये मेगा भरती; जाणून घ्या पदसंख्या, पात्रता आणि वेतन
Mpsc Mantra General Science Question Analysis career
Mpsc मंत्र: सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद

आक्षेप कसा नोंदवायचा?

ही परीक्षा २५ जुलै ते ३० जुलै दरम्यान घेण्यात आली. या परीक्षेत ६.२९ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. उत्तरपत्रिकेवर कोणत्याही विद्यार्थ्याला काही आक्षेप असल्यास हरकत नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने हरकती नोंदवू शकतात. याशिवाय, प्रति ऑब्जेक्शनला २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
  • मुख्यपृष्ठावरील “उत्तर की संबंधित आव्हान” (Challenge (s) regarding Answer Key) या लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • तुमचा आक्षेप नोंदवा.
  • फी भरा.

आयआयटी जेईई अ‍ॅडव्हान्स २०२२ (IIT JEE Advanced 2022) साठी नोंदणी प्रक्रिया

जेईई अ‍ॅडव्हान्स २०२२ साठी नोंदणी प्रक्रिया ७ ऑगस्टपासून सुरू होईल. नोंदणीची अंतिम तारीख ११ ऑगस्ट आहे. अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट आहे. उमेदवार jeeadv.ac.in वर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. ही परीक्षा २८ ऑगस्टपासून होणार आहे. जेईई अ‍ॅडव्हान्स्डचे प्रवेशपत्र २३ ऑगस्टला जारी केले जाईल.