सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

NIEPID रिजनल सेंटर, नवी मुंबई येथे पुढील (मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि रिहॅबिलिएशन काऊन्सिल ऑफ इंडियाचे मान्यताप्राप्त कोर्स आहेत.)

नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर दी एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ इंटेलेक्चुअल डिसएबिलिटीज (दिव्यांगजन) (NIEPID), मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, भारत सरकारची एक स्वायत्त संस्था.

NIEPID चे मुख्यालय सिकंदराबाद येथे असून त्यांची तीन रिजनल सेंटर्स नवी मुंबई, नोएडा आणि कोलकाता येथे आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२३ करिता प्रवेश –

(१) बी.एड. स्पेशल एज्युकेशन (इंटलेक्चुअल डिसएबिलिटी) B.Ed. Spl.Ed. (ID) – २ र्वष कालावधी.

कोर्स पूर्ण झाल्यावर उमेदवार स्पेशल एज्युकेटरचे काम करू शकतात.

– बौद्धिकदृटय़ा दिव्यांग असलेल्या मुलांच्या विशेष शाळांमध्ये को-ऑíडनेटर/इन्चार्ज/प्रिन्सिपल.

– सामान्य शाळांमधील गतिमंद आणि मुख्य प्रवाहातील अभ्यासक्रमात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी रिसोर्स रूम टीचर.

– विविध सेटिंग्जमधील मल्टि डिसिप्लिनरी टीम्समध्ये  विशेष अध्यापकाची भूमिका.

पात्रता – बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी. किंवा समतुल्य पदवी किमान सरासरी ५०%गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अजसाठी ४५%गुण) पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना अ‍ॅडमिशनच्या वेळी पदवी उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

प्रवेशक्षमता – २० जागा + २ जागा (ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी).

कोर्स फी – टय़ुशन फी रु. २३,५००/- प्रति वर्ष;  वसतीगृह शुल्क रु. ६,०००/- प्रति वर्ष; ग्रंथालय, वसतीगृह,  इ. साठी अनामत रक्कम रु. ५,०००/- (जी कोर्स पूर्ण केल्यास परत मिळेल.) पहिल्या वर्षी एकंदर रु. ४०,६२०/- फी भरावी लागेल.

(२) एम. एड. स्पेशल एज्युकेशन (इंटेलेक्चुअल डिसएबिलिटी) M.Ed. Spl. Ed. (ID) – २ र्वष.

प्रवेशक्षमता – १५ जागा.

पात्रता – बी.एड. स्पेशल एज्युकेशन ((MR/ID) किंवा बी.एड. (जनरल एज्युकेशन) आणि स्पेशल एज्युकेशन (मेंटल रिटारडेशन /इंटेलेक्चुअल डिसएबिलिटी) मधील डिप्लोमा. (पात्रता परीक्षेत किमान सरासरी ५०%गुण आवश्यक.)

कोर्स फी – टय़ूशन फी रु. २७,०००/ प्रति वर्ष, पहिल्या वर्षीसाठी एकत्रित फी रु. ४४,६२०/-.

शिष्यवृत्ती- अजा/अजच्या उमेदवारांना उत्तम शिक्षणाकरिता असलेली केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळविता येईल. कोर्स पूर्ण झाल्यावर उमेदवारांना टीचर एज्युकेटर/अ‍ॅडमिनिस्ट्रेटर/रिसर्चर म्हणून काम करण्याची संधी.

दोन्ही कोर्सेससाठी

(i) वयोमर्यादा – प्रवेशासाठी वयोमर्यादा नाही. परंतु ३५ वर्षांखालील उमेदवारांना प्रवेशात प्राधान्य देण्यात येईल.

(ii) निवड पद्धती – प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार  मुलाखत/समुपदेशनासाठी निवडले जातील.

प्रवेश परीक्षा – ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न १०० गुणांसाठी कालावधी ९० मिनिटे. (जनरल मेंटल अ‍ॅबिलिटी, जनरल नॉलेज, जनरल इंग्लिश, जनरल एज्युकेशन व स्पेशल एज्युकेशन यांचे व्यापक पलू (aspects) यावर आधारित प्रश्न)

(iii) प्रशिक्षणाचा कालावधी – २ शैक्षणिक वष्रे (प्रत्येक वर्षी २ सेमिस्टर्स).

(iv) अर्जाचा विहित नमुना NIEPID च्या http://www.niepid.nic.in या संके तस्थळावरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

(v)अर्जाचे शुल्क अजा/अज/दिव्यांग उमेदवारांसाठी रु. ९००/-, खुला प्रवर्ग/इमाव प्रवर्गासाठी रु. १,३००/-.

(vi)पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर दि. ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

(vii)परीक्षा आणि प्रशिक्षणाचे माध्यम – प्रशिक्षणाचे माध्यम इंग्लिश असेल. परंतु परीक्षा इंग्लिश/मराठी/हिंदीमधून लिहिण्याची अनुमती आहे.

Officer Incharge, National Institute for the Empowerment of Persons with Intellectual Disabilities

Officer Incharge, National Institute for the Empowerment of Persons with Intellectual Disabilities Kharghar, Navi Mumbai – 410 210.

NIEPID च्या नवी मुंबई येथील रिजनल सेंटरच्या कार्यालयात अर्ज विलंब शुल्काशिवाय विक्री आणि स्वीकारण्याचा अंतिम दि. ३० ऑगस्ट २०२१.

अर्ज विलंब शुल्कासह (रु. २००/-) विक्री आणि स्वीकारण्याचा अंतिम दि. १३ सप्टेंबर २०२१.

संपर्कासाठी फोन नं.

०२२-२७७४६८८९/२७७४३९८३.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंडियन स्कूल ऑफ माईन्स) (IITISM), धनबाद (Advt. No ४११००२/६/२०२१-NFR dt. १५.०७.२०२१). IITISM मध्ये एकूण ७३ ‘ज्युनियर असिस्टंट’ पदांची भरती. (अजा – ११, अज – ६, इमाव – २१, ईडब्ल्यूएस- १०, खुला – २५) (२ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव).

पात्रता – (दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी) (i) पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण. (ii) MS-Word, Excel, PowerPoint सारख्या कॉम्प्युटर ऑफिस अ‍ॅप्लिकेशन्स वापरामधील कौशल्य. (iii) कॉम्प्युटर टायिपग स्पीड इंग्लिश ४० श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि.

वयोमर्यादा – (दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी) ३० वष्रे (इमाव – ३३ वष्रे, अजा/अज – ३५ वष्रे, दिव्यांग – ४०/४३/४५ वर्षे).

वेतन – पे-लेव्हल – ३, अंदाजे वेतन दरमहा रु. ३८,०००/-.

निवड पद्धती – पार्ट-ए – स्क्रीिनग टेस्ट (पात्रता स्वरूपाची) ऑब्जेक्टिव्ह टाइप १०० गुणांसाठी. यातील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या १० पट (७३० उमेदवार) पुढील भरती प्रक्रियेसाठी निवडले जातील.

पार्ट-बी – ट्रेड टेस्ट (पात्रता स्वरूपाची) – टायिपग स्पीड आणि कॉम्प्युटर स्किल टेस्ट.

पार्ट-सी – मुख्य परीक्षा – स्टेप-१ – लेखी परीक्षा – ८० गुण, स्टेप-२ – कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट (MS-Word, Excel & PowerPoint) ) – २० गुण. एकूण १०० गुण.

रिक्रूटमेंट फी – रु. ५००/-. (अजा/अज/माजी सनिक/दिव्यांग/महिला उमेदवारांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज https://nfr.iitism.ac.in/index.php/recruitment/User Login या संकेतस्थळावरील Non-faculty Recruitment Module लिंकवरून दि. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत करावेत.