केंद्रीय विद्यालयामध्ये १३ हजारांहून अधिक पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज (२६ डिसेंबर २०२२) शेवटची तारीख आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेकडुन शिक्षक आणि शिक्षकेतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यासाठी कुठे अर्ज करायचा जाणून घ्या.

कोणत्या पदांसाठी होत आहे भरती?

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या
  • पोस्ट ग्रेजुएट शिक्षक (पीजीटी) – १४०९ पद
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) – ३१७९ पद
  • प्राथमिक शिक्षक (पीआरटी) – ६४१४ पद
  • पीआरटी (संगीत) – ३०३ पद

शिक्षकेतर कर्मचारी

  • असिस्टंट कमिश्नर – ५२ पद
  • प्राचार्य – २३९ पद
  • उप प्राचार्य – २०३ पद
  • ग्रंथपाल – ३५५ पद
  • वित्त अधिकारी – ६ पद
  • असिस्टंट इंजीनियर (सिव्हिल) – २ पद
  • असिस्टंट सेक्शन ऑफिसर (एएसओ) – १५६ पद
  • सीनियर सेक्रेटेरिअट असिस्टंट (यूडीसी) – ३२२ पद
  • जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (एलडीसी) – ७०२ पद
  • हिंदी ट्रान्सलेटर – ११ पद
  • स्टेनोग्राफर ग्रेड- २ – ५४ पद

कुठे करायचा अर्ज

  • kvsangathan.nic.in/ या केवीएसच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यावर ‘ऑनलाईन अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा योग्य फोन नंबर सबमिट करून, स्वतःची नोंदणी करा.
  • नंतर इतर तपशील माहितीसह लॉग इन करा.
  • अधिकृत कागदपत्रानुसार फॉर्म भरा.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करा.
  • तुमच्या कॅटेगरीनुसार फी भरा.
  • या अर्जाची भविष्यात गरज भासल्यास, तुमच्याकडे या फॉर्मची एक प्रिंट काढून ठेवा.