एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे एमटेक- कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या विशेष शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी दहावी व बारावीची परीक्षा कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण करून त्यानंतर चालू शैक्षणिक सत्रात सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय १ जुलै २०१४ रोजी २३ वर्षांहून अधिक नसावे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- मद्रास व दिल्ली येथे अथवा नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- सुरतकल व त्रिची येथे लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना वरील शिक्षण संस्थांमधील एमटेक् -कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल.
शिष्यवृत्तीचा कालावधी व रक्कम : या योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे कालावधीसाठी दरमहा ९००० रु.ची शिष्यवृत्ती व संबंधित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अथवा नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे शैक्षणिक शुल्क देण्यात येईल.
रोजगार संधी : वरील पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीपणे व चांगल्या शैक्षणिक आलेखासह पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पुढील संधीसाठी प्राधान्य देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : या योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शनच्या sharadbhate@radiffmail.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१४ आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शन विशेष शिष्यवृत्ती
एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे एमटेक- कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या विशेष शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
First published on: 03-02-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: L and t construction special scholarship