NEET UG 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) साठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व पात्र उमेदवार NEET UG 2022 साठी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मे २०२२ निश्चित करण्यात आली आहे. NTA द्वारे घेण्यात येणाऱ्या या प्रवेश परीक्षेद्वारे देशभरातील विविध वैद्यकीय संस्थांमधील पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. या परीक्षेत विद्यार्थ्यांकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचे २०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना २०० मिनिटे म्हणजे ३ तास २० मिनिटे दिली जातील.

अधिकृत सूचनेनुसार, या वर्षी NTA NEET UG १७ जुलै २०२२ रोजी दुपारी २ ते ५ वाजून २० मिनिटांपर्यंत घेण्यात येईल. ही चाचणी भारतातील ५४३ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू अशा एकूण १३ भाषांमध्ये घेतली जाईल. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र निश्चित वेळेत वेबसाइटवर अपलोड केले जातील. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

Job Opportunity UPSC Exams career
नोकरीची संधी: यूपीएससीच्या परीक्षा
Mumbai Port Trust Bharti 2024 Marathi News
Mumbai Port Trust Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता अन् वेतन
RITES Recruitment 2024:
RITES Recruitment: परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार निवड; केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी
BOI Officer Recruitment 2024
BOI Officer Recruitment 2024: बँक ऑफ इंडियाद्वारे १४३ पदांसाठी होणार भरती, १० एप्रिलपूर्वी करा अर्ज

सर्व पात्र उमेदवार NTA NEET UG 2022 साठी अधिकृत वेबसाइट neet.nta.ac.in द्वारे ६ मे २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना १६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अधिक तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट पाहू शकता.