शिस्त वागण्यात हवी
शिस्त बोलण्यात हवी
शिस्त शिकण्यात हवी
शिस्त जगण्यात हवी

शिस्त विचारात हवी
शिस्त आचारात हवी
शिस्त उच्चारात हवी

शिस्त उक्तीत हवी
शिस्त कृतीत हवी
शिस्त वृत्तीत हवी

शिस्त संवादात हवी
शिस्त संपर्कात हवी
शिस्त संबंधात हवी

शिस्त हवी मनापासून
कारण शिस्तीला पर्याय नाही
शिस्तीशिवाय कौशल्य नाही
शिस्तीशिवाय कुणी पारंगत नाही
शिस्तीशिवाय सुयश नाही

शिस्त नियमित पाळायला हवी
अंगी सतत बाणवायला हवी
सवयीनं मुरवायला हवी
‘शिस्त’बद्ध रुजवायला हवी

शिस्त नसेल तर अती होते
शिस्त नसेल तर हसे होते
शिस्त नसेल तर घाई होते
शिस्त नसेल तर ‘डोई’ होते

शिस्त जगण्याचा नियम हवा
शिस्त पाळण्याचा प्रयत्न हवा
शिस्त जपण्याचा संकल्प हवा

शिस्तीतून अवघ्या जगण्याला..
व्यक्तित्वाला विचारांचं कोंदण लाभते
सवयींमुळे अंगभूत वळण लागते
खरंतर स्वभावाला..
औषधाची गरज नसते.