केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे युवा संशोधकांना ‘इनोव्हेशन इन सायन्स परस्यूट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च’ (इन्स्पायर) योजनेंतर्गत खालीलप्रमाणे संशोधनपर संधी उपलब्ध आहेत-
नोंदणी करण्याची पद्धत व तपशील : या योजनेंतर्गत संबंधित संस्थेतर्फे प्राध्यापक-अध्यापकांना नोंदणीसाठी पुरस्कृत करण्यात येईल. याशिवाय इतर थेट निवड योजनेंतर्गत रीतसर अर्ज करावे लागतील.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय १ जानेवारी २०१४ रोजी ३२ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या अर्जदारांसाठी पाच वर्षांनी शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखत व सादरीकरणासाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
संशोधनपर रकमेचा तपशील व कालावधी : ‘इन्स्पायर’ योजनेंतर्गत उपलब्ध असणाऱ्या या प्राध्यापक संशोधक पाठय़वृत्ती योजनेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांची निवड झाल्यापासून पाच वर्षे कालावधीसाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या प्राध्यापकांना देय असणारी वेतनश्रेणी लागू करण्यात येईल. याशिवाय त्यांना त्यांच्या या संशोधनपर कालावधीसाठी वार्षिक सात लाख रु.ची संशोधन पाठय़वृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : या योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या http://www.inspire-dst.gov.in अथवा http://www.online-inspire.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व तपशील : अर्जदार प्राध्यापकांनी आपले अर्ज संबंधित संस्था प्रमुख, संचालक वा कुलगुरूंमार्फत तर इतरांनी आपले अर्ज खाली नमूद केलेल्या पत्त्यावर निर्धारित कालावधीमध्ये पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, इंडियन नॅशनल सायन्स अकादमी (आयएनएसए), बहादूरशाह जाफर मार्ग, नवी दिल्ली ११०००२ या पत्त्यावर २८ फेब्रुवारी २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.