आयआयटी प्रवेश परीक्षेत जेईई-अॅडव्हान्स्डमधील पहिल्या तीन रँक धारकांना त्यांच्या पसंतीच्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे येथे जायचे आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) अ‍ॅडव्हान्सचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली झोनमधील मृदुल अग्रवाल, ज्यांनी अव्वल क्रमांक मिळवला आहे, त्यांना आयआयटी बॉम्बेमध्ये कॉम्प्यूटर सायन्समध्ये बी टेक करायचे आहे. अग्रवाल, जे मूळचे राजस्थानचे आहेत, ते म्हणाले, “मी आयआयटी बॉम्बेच्या कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटमधून बी टेक करण्याचा विचार करत आहे. भविष्यात मला एमआयटीसारख्या जगातील टॉप युनिव्हर्सिटींमध्ये जायचे आहे.”

त्याने ३६० पैकी ३४८ गुण मिळवले आहेत आणि ही जेईई-अॅडव्हान्स्डमधील सर्वात जास्त टक्केवारी आहे. अग्रवालने जेईई-मेन परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले होते आणि इतर १७ जणांसह अव्वल स्थान मिळवले होते. जेईई-मेन आणि जेईई-अॅडव्हान्स्ड या दोन्हीमध्ये अव्वल रँक मिळवला आहे. द्वारकेचा रहिवासी धनंजय रमण, ज्याने परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला, त्याचे आयआयटी, मुंबई येथे शिक्षण घेण्याचेही ध्येय आहे. “एखाद्याने योग्य वेळापत्रक राखले पाहिजे आणि शक्य तितक्या विषयांची उजळणी केली पाहिजे,” ते पुढे म्हणाले, “मला आयआयटी बॉम्बेमध्ये अभ्यास करायचा आहे”.

( हे ही वाचा: जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये दिल्लीतील मृदुल अग्रवाल प्रथम)

दहावीत, रमणने राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा (National Talent Search Exam ) उत्तीर्ण केली आणि खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये जागतिक अव्वल बनले. रमण यांनी ११ व्या वर्गातील किशोर वैज्ञानीक प्रोत्साहन योजना परीक्षा देखील उत्तीर्ण केली. वसंत कुंज येथील रहिवासी असलेल्या अनंत लुनिया यांना परीक्षेत तिसरा क्रमांक मिळाला.

“कोविड -१९ च्या साथीच्या काळात माझ्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत फारसा बदल झालेला नाही. साथीच्या काळात मला शाळा नसल्यामुळे मला जास्त वेळ मिळाला. या काळात मी ज्या विषयांवर कमकुवत होतो त्यावर लक्ष केंद्रित केले. पुस्तकांवर लक्ष केंद्रित करण्याव्यतिरिक्त आणि नोट्स घेणे, चाचण्या देणे, मी अनेकदा केलेल्या मूर्ख चुकांचे विश्लेषण केले आणि त्यात सुधारणा केली, ”ते पुढे म्हणाले.

लुनिया म्हणाले की त्यांची पहिली पसंती आयआयटी बॉम्बे आणि त्यानंतर आयआयटी दिल्ली आहे. या वर्षी, आयआयटी खरगपूरने ही परीक्षा घेतली, जी प्रतिष्ठित आयआयटीमध्ये प्रवेशासाठी पात्रता परीक्षा आहे. जेईई-मेन्स देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेतली जात असताना, ती जेईई-अॅडव्हान्स्डसाठी पात्रता चाचणी म्हणून मानली जाते.

More Stories onआयआयटीIIT
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top students in jee advance exams wants to study at iit bombay ttg
First published on: 16-10-2021 at 10:25 IST