विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा किंवा UGC NET २०२१ नोंदणी आज म्हणजे ११ ऑगस्ट २०२१ पासून पुन्हा सुरू झाली आहे. युजीसी नेट २०२१ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर २०२१ आहे. जे उमेदवार या कोर्ससाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते ugcnet.nta.nic.in येथे तपशील तपासू शकतात.

जारी केलेल्या अधिकृत नोटिसनुसार, युजीसी नेट २०२० ही डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात येणार होती. मात्र, कोविड १९ रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे, यूजीसी नेट २०२१ चे वेळापत्रक जे जूनमध्ये आयोजित केले जायचे होते ते देखील विलंबित झाले. यूजीसी नेट परीक्षा ही राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीएद्वारे घेतली जाते.

यूजीसी नेट सर्कल नियमित करण्यासाठी एनटीएने डिसेंबर २०२० मध्ये यूजीसी नेट आणि जून २०२१ मध्ये यूजीसी नेट हे दोन्ही विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही परीक्षा कॉम्प्युटर-बेस्ड मोडमध्ये घेण्यात येतील. अशा प्रकारे, एनटीएने नवीन इच्छुकांना त्यांचे अर्ज सादर करण्यासाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.

यूजीसी नेट २०२१ : अर्ज कसा करावा?

  • तुम्ही सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in वर जा.
  • अप्लिकेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करा.
  • उमेदवारांनी प्रथम ऑनलाईन नोंदणी करावी.
  • ऑनलाइन अर्जासह तुम्हाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करता येऊ शकतात.
  • उमेदवारांना शुल्क ऑनलाईन भरावे लागते.
  • यूजीसी नेट २०२१ अर्जाचं शुल्क रु. १,००० आहे.
  • शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी भविष्यातील वापरासाठी फॉर्मची प्रत ठेवावी.