सैन्यदलात थेट निवड योजनेंतर्गत महिला विधी पदवीधरांची निवड करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक पात्रता : अर्जदार महिलांनी बारावीनंतर विधी विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केली असावी. त्या बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी करण्यासाठी पात्र व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात.
वयोगट : उमेदवारांचे वय २१ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे व त्यांचा जन्म २ जुलै १९८७ ते १ जुलै १९९३ च्या दरम्यान झालेला असावा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सैन्य निवड मंडळातर्फे निवड चाचणी, शारीरिक शिक्षण चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांना सैन्यदलाच्या कायदा विभागात सुरुवातीला लेफ्टनंट म्हणून दरमहा १५६००-३९१०० + ५४०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.
या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना सैन्यदलाच्या नियमांनुसार इतर भत्ते, फायदे व भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध होतील.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टोरेट जनरल ऑफ रिक्रूटिंग, आरटीजी- ए, जेएजी एंट्री, एजीज ब्रँच, आर्मी हेड क्वॉर्टर्स,
वेस्ट ब्लॉक-३, आर. के. पुरम, नवी दिल्ली-११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१४.
संग्रहित लेख, दिनांक 10th Feb 2014 रोजी प्रकाशित
सैन्यदलात महिला विधी पदवीधरांची निवड
सैन्यदलात थेट निवड योजनेंतर्गत महिला विधी पदवीधरांची निवड करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
First published on: 10-02-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens law graduate recruitment in troops