scorecardresearch

Premium

नोकरीची संधी

पदाचे नाव : सिक्युरिटी स्क्रीनर (फ्रेशर) – ९०६ पदे (३ वर्षांच्या कराराने भरती). नेमणुकीचा कालावधी वाढविला जाऊ शकतो.

Careers and Employment job01
(संग्रहित छायाचित्र)

सुहास पाटील

एअरपोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया, कार्गो लॉजिस्टिक्स ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAICLAS) (AAICLAS ही एअरपोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाची १०० टक्के उपकंपनी (subsidiary) आहे.) मध्ये ९०६ सिक्युरिटी स्क्रीनर (फ्रेशर) पदांवर भरती. (Engagement Advt. No. १०/२०२३)

man who 'came back to life' thanks to a pothole
ऐंशी वर्षांच्या आजोबांना मिळाले जीवदान! मृत घोषित केल्यानंतर कसा घडला ‘हा’ चमत्कार जाणून घ्या…
Application by Foreign Creditors for Bankruptcy of Byju to Bangalore Bench of National Company Law Tribunal print economic news
परकीय देणेकऱ्यांकडून ‘बायजू’च्या दिवाळखोरीसाठी अर्ज; राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या बंगळूरु खंडपीठाकडे धाव
police inspector vasant babar of pimpri chinchwad announced president medal eve of republic day
२८ वर्षांची सेवा, ३५१ बक्षीस, अन् २३ प्रशस्तीपत्रक; पिंपरीतील ‘या’ पोलीस अधिकाऱ्याला जाहीर झाले राष्ट्रपती पदक
Zee promoters face more trouble due to SEBI investigation economic news
‘सेबी’च्या तपासातून झी प्रवर्तकांच्या अडचणीत आणखी वाढ; समभागांची ३३ टक्क्यांनी घसरगुंडी

पदाचे नाव : सिक्युरिटी स्क्रीनर (फ्रेशर) – ९०६ पदे (३ वर्षांच्या कराराने भरती). नेमणुकीचा कालावधी वाढविला जाऊ शकतो.

पात्रता : (दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी) पदवी कोणत्याही शाखेतील किमान ६० टक्के गुणांसह (अजा/ अज उमेदवारांसाठी किमान ५५ टक्के गुण) उत्तीर्ण. उमेदवारांना हिंदी/ इंग्रजी भाषा वाचता/बोलता येणे आवश्यक आहे आणि स्थानिय भाषेत संभाषणात पारंगत असावा.

वयोमर्यादा : दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी २७ वर्षेपर्यंत (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज/ माजी सैनिक – ५ वर्षे).

निवड पद्धती : इंटरॲक्शन आणि कागदपत्र पडताळणी – शॉर्ट लिस्टेड पात्र उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर कॉल लेटरद्वारे इंटरॲक्शनचे ठिकाण कळविले जाईल.

शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना नेमणुकीपूर्वी पुढील टेस्टना सामोरे जावे लागेल.

हेही वाचा >>> स्पर्धेत धावण्यापूर्वी : शाखा निवडीसाठी पालकांशी संवाद हवाच

(i) डोळा/ रंग आंधळेपणा टेस्ट (Eye/ color blindness exam) (ii) unimpaired vision आणि श्रवणशक्ती (hearing ability). (iii) एक्स-रे उपकरणांनी (X- ray equipments) हायलाईट केलेले ऑब्जेक्टस ओळखणे. (iv) उत्तम संवाद आणि लेखन कौशल्य. (v) चांगली शारीरिक शक्ती आणि क्षमता.

३ वर्षांच्या कराराची सुरुवात सर्व सर्टिफिकेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच होईल.

नोकरीचे ठिकाण : देशभरात कोठेही. (पुणे, इंदौर, सूरत, गोवा, वडोदरा, रायपूर इ.)

वेतन : निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला रु. १५,०००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनीजना दरमहा एक कॅज्युअल लिव्ह मिळू शकेल. (नैमित्तिक रजा)

ट्रेनिंग दरम्यान घेतल्या जाणाऱ्या परीक्षांतून (यासाठीची फी आणि TA/ DA भत्ता AAI CLAS यांचेकडून भरली जाईल.) उत्तीर्ण उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा रु. ३०,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ३२,०००/- आणि तिसऱ्या वर्षी रु. ३४,०००/- वेतन दिले जाईल. मेडिकल इन्श्युरन्सकरिता दरवर्षी रु. १०,०००/- पर्यंतची रकमेची परतफेड केली जाईल.

निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती ठरावीक मुदतीच्या कराराने (FTC) ३ वर्षांच्या कालावधीसाठी केली जाईल. यातील १ वर्षाचा कालावधी प्रोबेशन असेल. प्रोबेशन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यास सिक्युरिटी स्क्रीनर पदावर नेमणूक दिली जाईल.

अअक उछअर पुढील ट्रेनिंग आयोजित करणार आहे. पहिल्या प्रयत्नाकरिता ट्रेनिंगचा सर्व खर्च (ट्रेनिंगसाठी जाण्या-येण्याचा, ट्रेनिंगची फी इ.) AAI CLAS करणार आहे.

(१) AVSEC इन्डक्शन कोर्स, (एअरपोर्ट ऑपरेटर/ एअरलाईन यांच्या ASTIl s ने मान्यता दिलेल्या BCAS येथे) कालावधी ५ दिवस.

(२) BASIC AVSEC ला बसण्यापूर्वी ३ महिने कालावधीचा सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटी ऑपरेशन्स कोर्स.

(३) AVSEC BASIC कोर्स – कालावधी १४ दिवस.

(४) सिक्युरिटी इक्विपमेंट्सवरील ४० तासांचे ऑन जॉब ट्रेनिंग (OJT). (एअरपोर्ट येथे)

(५) एअरपोर्ट ऑपरेटर मान्यताप्राप्त ASTI कडून ३ दिवस कालावधीच्या स्क्रीनर्स प्री-सर्टिफिकेशन कोर्स.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : भारतात किती प्रकारची वने आढळतात? त्यांची वैशिष्ट्ये कोणती?

(६) BCAS यांचेकडील टेस्टींग आणि स्क्रीनर सर्टिफिकेशन कोर्स २ दिवसांचा.

हे सर्व कोर्स ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त दोन प्रयत्नांत पूर्ण करणे आवश्यक आहे. पहिल्या प्रयत्नात हे कोर्स उत्तीर्ण न करू शकलेल्या उमेदवारांचे स्टायपेंड रु. १५,०००/- वरून रु. १०,०००/- करण्यात येईल, दुसऱ्या प्रयत्नात हे कोर्स उत्तीर्ण न करू शकणाऱ्या उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात येईल. पहिल्या प्रयत्नात हे कोर्स उत्तीर्ण न करू शकलेल्या उमेदवारांना दुसऱ्या प्रयत्नासाठी ट्रेनिंग कॉस्ट उमेदवारांना स्वत भरावा लागेल. तसे न केल्यास करार बंद करण्यात येईल.

कामाचे स्वरूप : कार्गो आणि इनलाईन होल्ड बॅगेजचे स्कॅनिंग करणे आणि/ किंवा एअरपोर्ट आणि कार्गो काँप्लेक्स येथे इतर सिक्युरिटी कामे पार पाडणे.

शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी hr. recruitment@aaiclas.aero वर संपर्क साधा. जर दोन दिवसांत उत्तर आले नाही तर हेल्पडेस्क नंबर ०११-२४६६७७१३ वर संपर्क साधा.

अर्जाचे शुल्क : रु. ७५०/-. (अजा/ अज/ महिला/ ईडब्ल्यूएस उमेदवारांना फी रु. १००/- आहे. त्यांनी संबंधित दाखला दाखल करणे आवश्यक.)

अर्जासोबत (i) १० वी/ १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र. (ii) पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र, (iii) पदवीचे गुणपत्रक, (iv) कास्ट/ कॅटेगरी सर्टिफिकेट, (v) आधारकार्ड, (vi) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ (upto sq KB size), (vii) Scanned Signature (max. 20 KB size). (viii) अर्जाचे शुल्क ऑनलाईन. ऑनलाईन अर्ज https:// aaiclas.aero/career या संकेतस्थळावर ८ डिसेंबर २०२३ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत. (Career ; Engagement Advt. No. 04 of 2023 Registration; fill in application form; upload scanned copies of following documents (as per para 4.2); deposit application fee)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai recruitment 2023 job in airports authority of india airports authority of india recruitment 2023 zws

First published on: 05-12-2023 at 17:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×