सुहास पाटील
दि डायरेक्टर जनरल आसाम रायफल्स, शिलाँग ग्रुप-बी आणि ग्रुप-सी च्या एकूण १६१ पदांच्या भरतीसाठी दि. १८ डिसेंबर २०२३ पासून ‘आसाम रायफल्स टेक्निकल आणि ट्रेड्समन रिक्रूटमेंट रॅली २०२४’ आयोजित करणार आहे.
महाराष्ट्र आणि जवळील राज्यांसाठीच्या रॅलीतून भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील-
(१) वॉरंट ऑफिसर (पर्सोनल असिस्टंट) (पुरुष व महिला) महाराष्ट्र – इमाव – १; आंध्र प्रदेश – खुला – १.
पात्रता : १२ वी उत्तीर्ण. स्किल टेस्ट (कॉम्प्युटर) चे निकष – डिक्टेशन – ( i) १० मिनिटांसाठी ८० श.प्र.मि. वेगाने. ( ii) ट्रान्सक्रिप्शनसाठी वेळ – इंग्लिश – ५० मिनिटे किंवा हिंदी – ६५ मिनिटे.
(२) रायफलमॅन (लाईनमन फिल्ड) (फक्त पुरुष) महाराष्ट्र – खुला – १; तेलंगणा – खुला – १; आंध्र प्रदेश – इमाव – १.
पात्रता : १ वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट.
(३) रायफलमॅन (रिकव्हरी वेहिकल मेकॅनिक) (फक्त पुरुष) महाराष्ट्र – इमाव – १; तेलंगणा – खुला – १; मध्य प्रदेश – अज – १; आंध्र प्रदेश – अजा – १; गुजरात – खुला – १; छत्तीसगड – खुला – १; कर्नाटक – इमाव – १.
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि रिकव्हरी वेहिकल मेकॅनिक किंवा रिकव्हरी वेहिकल ऑपरेटर ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट.
(४) नायब सुभेदार (ब्रिज अॅण्ड रोड्स) (पुरुष व महिला) महाराष्ट्र – अज – १; तेलंगणा – इमाव – १; मध्य प्रदेश – अजा – १; आंध्र प्रदेश – ईडब्ल्यूएस – १; गुजरात – इमाव – १; छत्तीसगड – इमाव – १; कर्नाटक – अजा – १.
हेही वाचा >>> UPSC-MPSC : पर्यावरण नैतिकता म्हणजे काय? त्यातील विविध समस्या कोणत्या?
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि सिव्हील इंजिनिअरींग डिप्लोमा (ब्रिज अॅण्ड रोड).
(५) नायब सुभेदार (इलेक्ट्रिकल अॅण्ड मेकॅनिकल) (फक्त पुरुष) महाराष्ट्र – खुला – १; तेलंगणा – अजा – १; मध्य प्रदेश – इमाव – १; आंध्र प्रदेश – खुला – १; छत्तीसगड – अज – १; कर्नाटक – खुला – १.
पात्रता : इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हील इंजिनिअरींग पदवी.
(६) वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन) (फक्त पुरुष) महाराष्ट्र – खुला – १; आंध्र प्रदेश – इमाव – १.
पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि ३ वर्षं कालावधीचा आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा.
(७) रायफलमॅन (प्लंबर) (फक्त पुरुष) महाराष्ट्र – ईडब्ल्यूएस – १; मध्य प्रदेश – खुला – १; आंध्र प्रदेश – खुला – १.
पात्रता : १ वी उत्तीर्ण आणि प्लंबर ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट.
(८) हवालदार (एक्स-रे असिस्टंट) (फक्त पुरुष) महाराष्ट्र – अजा – १; तेलंगणा – खुला – १; आंध्र प्रदेश – अज – १; गुजरात – खुला – १; छत्तीसगड – खुला – १; कर्नाटक – खुला – १.
पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि रेडिओलॉजीमधील डिप्लोमा.
ज्या राज्यांतील पदांसाठी उमेदवार अर्ज करणार आहेत त्या राज्याचा तो रहिवासी ( Domicile)/परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट धारण केलेला असावा.
वयोमर्यादा : (दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी) पद क्र. १, ३ व ६ साठी १८ ते २५ वर्षे. पद क्र. २, ४, ७ व ८ साठी १८ ते २३ वर्षे. पद क्र. ५ साठी १८ ते ३० वर्षे.
कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे.
शारीरिक मापदंड ( PST) : पद क्र. २ ते ८ साठी पुरुष – उंची – १७० सें.मी. (अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी १६२.५ सें.मी.) छाती – ८०-८५ सें.मी. (अजसाठी ७६-८१ सें.मी.)
पद क्र. १ साठी पुरुष – उंची – १६५ सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.) छाती – ७७ ते ८२ सें.मी. (अज – ७६ ते ८१ सें.मी.)
पद क्र. १ साठी महिला – उंची – १५५ सें.मी. (अज – १५ सें.मी.)
पद क्र. ४ ते ६ साठी महिला – उंची – १५७ सें.मी. (अज – १५० सें.मी.)
शारीरिक क्षमता चाचणी (PET) : सुरुवातीच्या कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल. ढएळ फक्त पात्रता स्वरूपाची असेल.
पुरुष उमेदवार – ५ कि.मी. अंतर २४ मिनिटांत धावणे.
महिला उमेदवार – १.६ कि.मी. अंतर ८.३० मिनिटांत धावणे.
ट्रेड टेस्ट (स्किल टेस्ट) : PET/ PST मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना ट्रेड टेस्ट (स्किल टेस्ट) द्यावी लागेल. (जी फक्त पात्रता स्वरूपाची असेल.) ट्रेड टेस्ट (स्किल टेस्ट) मधील पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
लेखी परीक्षा – १०० गुणांच्या पेपरमध्ये पात्रतेसाठी खुला/ ईडब्ल्यूएस उमेदवारांना ३५ टक्के गुण मिळविणे आवश्यक. अजा/ अज/ इमाव उमेदवारांना ३३ टक्के गुण आवश्यक. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून एकूण रिक्त पदांच्या ४ पट उमेदवार डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (DME) साठी पाठविले जातील.
डिटेल्ड मेडिकल टेस्ट (DME) आणि रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन (RME) – DME मध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांची रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन (RME) घेतली जाईल.
मेरिट लिस्ट आणि ट्रेनिंगसाठी बोलाविणे : सर्व प्रकारच्या टेस्टमधील पात्र उमेदवारांची ट्रेडनुसार कॅटेगरीनिहाय संबंधित राज्यासाठी नेमून दिलेल्या पदांसाठी गुणवत्ता यादी बनविली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल.
शंकासमाधानासाठी पुढील हेल्पलाईनशी संपर्क साधावा – ०३६४-२५८५११८, ०३६४-२५८५११९ आणि ८७९४१०१६९३.
PST/ PET आणि लेखी परीक्षेसाठी केंद्र आसाम, नागालँड आणि मेघालय राज्यांमधील असतील. PST/ PET आणि लेखी परीक्षेसंबंधित माहिती (ठिकाण, हजर राहण्याचा दिनांक इ.) ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांना आसाम रायफल्सच्या www. assamrifles. gov. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
अर्जाचे शुल्क : पद क्र. ४ नायब सुभेदार (ब्रिज अॅण्ड रोड्स) पदांसाठी रु. २००/-, इतर पदांसाठी रु. १००/-. परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावी. SBI Current Account No. 37088046712 in favour of HQ, DGAR, Recruitment Branch, Shillong १० at SBI Laitkor Branch IFSC Code – SBIN0013883. ऑनलाइन अर्ज www. assamrifles. gov. in या संकेतस्थळावर दि. १९ नोव्हेंबर २०२३ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाची प्रिंटआऊट आणि अर्जाचे शुल्क भरल्याचा पुरावा PST/ PET च्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.