Bank Of Maharashtra Recruitment 2023 Registration Begins: बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे मोठी भरती होणार असून त्यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. नोंदणी लिंक आज म्हणजेच १३ जुलै २०२३ (गुरुवार) पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता ज्याचा पत्ता आहे bankofmaharashtra.in. आजपासून सुरू झालेली ही अर्जाची प्रक्रिया २५ जुलैपर्यंत सुरू राहिल म्हणजे अर्जाची शेवटची तारीख २५ जुलै २०२३ असणार आहे. या पदांसाठी केवळ ऑनलाईन अर्ज करू शकता आणि इतर कोणत्याही माध्यामातून अर्ज स्विकार केले जाणार नाही.

४०० पदांसाठी होणार भरती

बँक ऑफ महाराष्ट्रच्या या पदाच्या भरतीसाठी एकूण ४०० जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी १०० पद ऑफिसर स्केल ३साठीआहे आणि ३०० पद स्केल २ साठी आहे. इतर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अधिसुचना – https://bankofmaharashtra.in/writereaddata/documentlibrary/0069b591-be72-4327-9d6f-6ab1a597164b.pdf

अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/bmcgomay23/

शैक्षणिक पात्रता

या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मानत्या प्राप्त विद्यापीठातून कमीत कमी ६० टक्के गुणांसह उतीर्ण बॅचलर्स डिग्री असली पाहिजे. ही डिग्री कोणत्याही शाखेतील असू शकते. वयोमर्यादेबाबत सांगायचे झाल्या ऑफिसर स्केल ३ नुसार वयोमर्यादा २५ ते ३८ वर्ष आहे आणि ऑफिसर स्केल २ साठी वयोमर्यादा २५ ते ३५ वर्ष निश्चित केली आहे.

उमेदवाराची निवड कशी होईल

या पदासाठी पात्र उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षेच्या माध्यामतून होईल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. त्यांच्या रँकिंगनुसारते १:४च्या प्रमाणात असेल. ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीसाठी निश्चिक गुण संख्या १५० आणि १०० आहे जे ७५:२५ च्या प्रमाणात पाहिले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज शुल्क

अर्ज करण्यासाठी जनरल कॅटगरीसाठी शुल्क ११८० रुपये आहे. आरक्षित श्रेणीसाठी शुल्क ११८ रुपये आहे.