BARC Recruitment 2023: तुम्ही १२वी पास किंवा पदवीधर असाल आणि भाभा अणु संशोधन केंद्रात सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) ने विविध शाखांमध्ये ४३०० हून अधिक सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. केंद्राने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार(सं.०३२०२३/भापअ केंद्र), स्टायपेंडरी ट्रेनी, विविध विभागांमध्ये टेक्निकल ऑफिसर, सायंटिफिक असिस्टेंट (फूड टेक्नोलॉजी / होम सायन्स / न्यूट्रीशन) आणि टेक्निशियन (बॉयलर अटेंडेंट)च्या एकूण ४३७३ जागावर भरती होणार आहे. २४ एप्रिलपासून करु शकता अर्ज भाभा अणु संशोधन केंद्राद्वारे जाहीर ४३७४ सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवार अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. barc.gov.inवर करिअर सेक्शनमध्ये उपलब्ध करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवारी २४ एप्रिलपासून सुरू होत आहे आणि शेवटची तारीख २२ मे २०२३ पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी टेक्निकल ऑफिसर पदांसाठी ५०० रुपये, सायंटिफि असिस्टेंट आणि स्ट्रायपेंड्री ट्रेनीसाठी १५० रुपये आणि टेक्निशिअन पदांसाठी १०० रुपये शुल्क भरावे लागते. पण एससी, एसटी आणि दिव्यांग गटातील उमेदवांरासह सर्व महिला उमेदवारंना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. हेही वाचा : फक्त २५ रुपये अर्ज शुल्क भरून होऊ शकता सरकारी अधिकारी, तेही परिक्षेशिवाय; फक्त ‘ही’ अट करावी लागेल पूर्ण BARC भरती 2023 अधिसूचना PDF - मिळेल BARC भरती २०२३ अर्ज करण्याची लिंक - BARC भरती 2023 : भाभा अणु संशोधन केंद्राद्वारे ४३७४ सरकारी नोकरीसाठी पात्रता बीएआरसी भरती 2023 अधिसूचनानुसार, स्ट्राइपेंड्री ट्रेनी पदासाठी उमेदवारला कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमधून १०+२ परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुणांनी उतीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच रिक्त जागांसंबधित ट्रेडमध्ये ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यकत आहे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांसाठी जास्त वयोमर्यादेमध्ये सुट दिली जाणार आहे. इतर पदांसाठी पात्रता आणि भरतीच्या तपशील जाणून घेण्यासाठी भाभा भरती २०२३ अधिसुचना पाहू शकता.