सुहास पाटील

बीईएमएल लिमिटेड (BEML Ltd) (भारत सरकारचा उपक्रम), बेंगळूरु (Advt.No.KP/ S//०६/२०२३  dt. २७.०९.२०२३). बीईएमएल लिमिटेड आपल्या देशभरात स्थित असलेल्या विविध मॅन्युफॅक्चिरग युनिट्स (म्हैसूर आणि बंगलोर) आणि मार्केटिंग डिव्हीजन्समध्ये ग्रुप-सी च्या एकूण ११९ पदांची भरती.

iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Tata Institute of Social Sciences Mumbai hiring
TISS Mumbai recruitment 2024 : टाटा इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदावर होणार भरती
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

(१) डिप्लोमा ट्रेनी-मेकॅनिकल – ५२ पदे (अजा – ९, अज – ४, इमाव – १४, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २०).

(२) डिप्लोमा ट्रेनी-इलेक्ट्रिकल – २७ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १०).

(३) डिप्लोमा ट्रेनी-सिव्हील – ७ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ४).

पात्रता : (दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी) पद क्र. १ ते ३ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६० टक्के  गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण).

(४) आयटीआय ट्रेनीज-मशिनिस्ट – १६ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).

हेही वाचा >>> भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या २२४ रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरु

(५) आयटीआय ट्रेनीज-टर्नर – १६ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७)

पद क्र. ४ व ५ साठी पात्रता : संबंधित ट्रेडमधील फर्स्ट क्लाससह (६० टक्के) आयटीआय नॅशनल अ‍ॅप्रेंटिस सर्टिफिकेटसह उत्तीर्ण. (अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण)

(६) स्टाफ नर्स – १ पद (खुला). कामाचे ठिकाण – म्हैसूर, कर्नाटकमधील  इएटछ चे मॅन्युफॅक्चिरग युनिट.

पात्रता : बी.एस्सी. (नर्सिग) किंवा ३ वर्षांचा डिप्लोमा इन नर्सिग अ‍ॅण्ड मिडवायफरी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण)

कमाल वयोमर्यादा : (दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी) पद क्र. १ ते ५ साठी २९ वर्षे, पद क्र. ६ साठी ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे)

वेतन श्रेणी : डिप्लोमा ट्रेनीजसाठी (रु. २३,९१० – ८५,५७०); आयटीआय ट्रेनीजसाठी (रु. १६,९०० – ६०,६५०); स्टाफ नर्ससाठी (रु. १८,७८० – ६७,३९०).

डिप्लोमा ट्रेनिजना – १ वर्षांचे ट्रेनिंग आणि २ वर्ष कराराने काम करावे लागेल. ट्रेनिंग कालावधी दरमहा रु. १५,०००/- एकत्रित स्टायपेंड दिले जाईल. २ वर्षांच्या कराराच्या कालावधीत पहिल्या वर्षी दरमहा रु. १७,०००/- आणि दुसऱ्या वर्षी दरमहा रु. १९,५००/- स्टायपेंड दिले जाईल. यशस्वीरित्या ट्रेनिंग आणि कराराचा कालावधी पूर्ण केल्यावर आवश्यकता असल्यास त्यांना  Wage Group Sr (वेतन श्रेणी रु. २३,९१० – ८५,५७०) वर कायम केले जाईल.

आयटीआय ट्रेनीज – २ वर्षांच्या ट्रेनिंग दरम्यान पहिल्या वर्षी रु. १४,०००/- आणि दुसऱ्या वर्षी रु. १५,०००/- दरमहा एकत्रित स्टायपेंड दिले जाईल. २ वर्षांच्या करार कालावधीमध्ये पहिल्या वर्षी रु. १६,५००/- आणि दुसरम्या वर्षी रु. १८,०००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग आणि कराराचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यास  BEML च्या आवश्यकतेनुसार  Wage Group B (वेतन श्रेणी रु. १६,९०० – ६०,६५०) वर कायम केले जाईल.

स्टाफ नर्स पहिले २ वर्ष कराराने काम करतील. पहिल्या वर्षी रु. १६,५००/- व दुसऱ्या वर्षी रु. १८,०००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. कराराचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यास त्यांना आवश्यकतेनुसार Wage Group C (वेतन श्रेणी रु. १८,७८० – ६७,३९०) वर कायम केले जाईल.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : आठव्या पंचवार्षिक योजनेपूर्वी सुरू झालेली ‘स्वावलंबन योजना’ काय होती? ती का सुरू करण्यात आली?

निवड पद्धती : कॉम्प्युटर बेस्ड लेखी परीक्षा ज्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (क्वांटिटेटिव्ह अ‍ॅबिलिटी/ अ‍ॅप्टिटय़ूड, जनरल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रिझिनग अ‍ॅबिलिटी, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज (बेसिक नॉलेज) आणि सब्जेक्ट/ ट्रेड टेस्ट) विषयांवर आधारित असतील.

लेखी परीक्षा मुंबई, दिल्ली, बेंगळूरु आणि कोलकत्ता केंद्रांवर घेतली जाईल.

उमेदवारांनी परीक्षा केंद्रांसाठी आपला पसंतीक्रम अर्ज करताना देणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज  http://www.bemlindia.in  या संकेतस्थळावर दि. १८ ऑक्टोबर २०२३ (१८.०० वाजे) पर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती, अर्जासोबत अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी  BEML च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.suhassitaram@yahoo.com