BOI Recruitment 2024 : बँक ऑफ इंडियाअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. ‘स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर’ (Specialist Security Officer) या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी bankofindia.co.in. या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. तसेच अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३ एप्रिल २०२४ असणार आहे.

BOI Recruitment 2024 : भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव व नोकरीचे ठिकाण यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Naval Dockyard Mumbai Recruitment 301 Vacancies for Apprentice posts Know all details for online application
Naval Dockyard Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! नेव्हल डॉकयार्डने जाहीर केली नवीन भरती; ‘असा’ करा अर्ज
sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
WAPCOS Engineer Recruitment or Bharti For 275 Various Posts Check selection process and important details
WAPCOS Recruitment 2024: इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; ‘असा’ करा अर्ज
Pawan Hans released notification for Associate Helicopter Pilot posts Check Details Here
Pawan Hans Bharti 2024: पवन हंस अंतर्गत ‘या’ पदासाठी होणार भरती; चार लाखांपर्यंत मिळणार पगार, असा करा अर्ज

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे २५ ते ३५ वर्षांदरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असावा आणि त्याच्याजवळ तीन महिन्यांच्या संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रसुद्धा असावे.

अनुभव : संभाव्य अर्जदारांकडे खालीलपैकी एक अनुभव असणे गरजेचे आहे.

१. उमेदवाराकडे लष्कर, नौदल किंवा हवाई दलात पाच वर्षांपेक्षा जास्त सेवेसह अधिकारी पद असावे.

२. पोलिस अधिकारी उपअधीक्षक किंवा उच्च पदावर किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

३. निमलष्करी दलांमध्ये सहायक कमांडन्टच्या पदासाठी किमान पाच वर्षं काम केलेले असावे.

निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखत किंवा गट चर्चेद्वारे केली जाईल (प्राप्त अर्जाच्या संख्येवर अवलंबून जीडी आयोजित केली जाईल.) उमेदवारांची एक यादी तयार केली जाईल. संबंधित एससी / एसटी / ओबीसी / ईव्हीएस / जनरल श्रेणीनुसार उतरत्या क्रमाने ३० गुणांची वैयक्तिक मुलाखत आणि ७० गुणांच्या गट चर्चेत उमेदवारांना मिळालेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

अर्ज शुल्क – अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST)च्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये. तर, सामान्य आणि इतर श्रेणींसाठी ८५० रुपये अर्ज शुल्क असणार आहे.

हेही वाचा…ICT Bharti 2024: मुंबई ICT अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; विविध पदांकरीता भरती सुरु, लवकर करा अर्ज

अर्ज कसा कराल?

  • बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत bankofindia.co.in या वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर करिअर किंवा भरती विभागात जा.
  • अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करा किंवा न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
  • येथे तुमची माहिती भरा. जसे की नाव, पत्ता, संपर्क माहिती आदी.
  • आवश्यक कागदपत्रे तेथे नमूद केलेल्या आकारात (Size) अपलोड करा
  • त्यानंतर अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी काळजीपूर्वक एकदा वाचून घ्या.
  • फ्रॉम अर्ज सबमिट करा आणि संदर्भासाठी एक प्रिंटआउटसुद्धा घ्या.

उमेदवार या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात.

https://ibpsonline.ibps.in/boissofeb24/

अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.