डॉ. श्रीराम गीत

मी आता बीए तृतीय वर्षांत आहे. पुढील उच्च शिक्षण विद्यापीठात घेण्याची इच्छा आहे. पण सोबतच एमपीएससी २०२५ चा अभ्यास करत आहे. पुढील शिक्षणामुळे एमपीएससीकडे दुर्लक्ष होईल असे वाटते. मग असा विचार करत आहे की मुक्त विद्यापीठातून पुढील शिक्षण पूर्ण करावे.  कृपया मार्गदर्शन करावे. – बाळाराम रामरूळे

The University Grants Commission UGC has decided to allow universities to conduct postgraduate degree courses online remotely pune news
एकीकडे मोकळीक, दुसरीकडे नियमांचे बंधन… शिक्षण संस्थांचे म्हणणे काय?
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’

वर्गात बसून केलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगच होतो. यूपीएससीसाठी ते आवश्यकच किंवा गरजेचं असतं असं समजायला हरकत नाही. एमपीएससीसाठी सुद्धा त्याचा उपयोगच होईल. तसेच प्लॅन बी म्हणून सुद्धा त्याचा फायदा होतो. जरूर विद्यापीठात येऊन अभ्यासक्रम पूर्ण करा. त्या दरम्यान पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतो व नाही याचा तुम्हालाही अंदाज येईल.

मी २०२३ मध्ये बीबीए पूर्ण केले. सर मी यूपीएस्सीचा अभ्यास करत आहे. २०२५ ला मी पहिला प्रयत्न देणार आहे. त्यामध्ये लवकर यश मिळवण्यासाठी मी कोणत्या गोष्टी करायला हव्यात? अभ्यासाची रणनीती काय असायला हवी? समाजशास्त्र हा विषय आहे. माध्यम मराठी निवडले आहे. तयारी कशी करू?  – अजय घोंघावले.

बीबीएच्या अभ्यासक्रमाचा स्पर्धा परीक्षांसाठी फारसा उपयोग होत नाही. समाजशास्त्र हा विषय बीबीएमध्ये अजिबातच नाही. समाजशास्त्राचा यूपीएससीसाठीचा अभ्यास एखादी नोकरी मिळवून ती करताना दोन वर्षे किमान यूपीएससीचा अभ्यास करणे गरजेचे राहील.

बारावीपासून कला शाखा किंवा बीबीए सारखे विषय असले तर पूर्व परीक्षा व सी सॅटचा पेपर देणे सुद्धा खूप कठीण जाते. त्या दोघांवर प्रथम लक्ष केंद्रित करावे. एकीकडे सोशिऑलॉजी वाचणे चालू ठेवावे.

एक छोटासा प्रश्न स्वत:लाच विचारा. आरक्षण विषयात गेल्या वर्षभरात घडलेल्या साऱ्या घडामोडीवर चारपाच पानाचा निबंध सलग दोन तासात लिहू शकता का? ही त्या विषयाची किमान तयारी समजायला हरकत नाही.